शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर अट्टल गुन्हेगाराचे बीड जिल्हा रुग्णालयातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:13 IST

आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बालाजी जाधव (रा. रूपचंद नागर तांडा, जि. लातूर) याने पलायन केले.

बीड : आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बालाजी जाधव (रा. रूपचंद नागर तांडा, जि. लातूर) याने पलायन केले. त्याच्या शोधासाठी बीड पोलिसांची पथके रवाना झाली असली तरी या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून ज्ञानोबाने भिंतीवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला होता; परंतु उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय मोडले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. पुन्हा २४ मार्च रोजी शौचास जाण्याचा बहाणा करीत तो शौचालयात गेला व खिडकीतील काचाने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातून बचावल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या निगराणीसाठी ए.पी. चव्हाण नामक पोलीस हवालदार नियुक्त केला होता.

सोमवारी दुपारच्या सुमारास चव्हाणही शौचास गेले होते. हीच संधी साधून ज्ञानोबाने हातकडी काढून जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. हा प्रकार चव्हाण यांना परतल्यानंतर लक्षात आला. त्यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक (गृह) भास्कर सावंत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ, एलसीबीचे सपोनि दिलीप तेजनकर, पो.उप.नि. भूषण सोनार यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली; परंतु त्यांना आरोपी शोधण्यात अपयश आले. हा प्रकार पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तात्काळ पथके नियुक्त करुन आरोपीच्या शोधासाठी रवाना केली.

छोट्या भावाचा जामिनासाठी प्रयत्न

ज्ञानोबा हा अंबाजोगाई येथील एका चोरीच्या प्रकरणात कारागृहात होता. त्याचा जामीन मिळविण्यासाठी ज्ञानोबाचा छोटा भाऊ प्रयत्नशील होता. ३१ मार्च रोजी त्याचा जामीन होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र, तत्पूर्वी ज्ञानोबाने पलायन केले.

आई आणि बहीणही जिल्हा रुग्णालयातचज्ञानोबाच्या आईचा अपघात झाल्याने त्या वॉर्ड क्र. ७ मध्ये उपचार घेत आहेत. त्याची छोटी बहीण आईसोबत आहे. पळून जाण्यापूर्वी आई व बहीण त्याला भेटले होते, असे सूत्रांकडून समजते.

आरोपींचे वाढते पलायन; चिंतेचा विषयमागील काही दिवसांपासून बीड पोलिसांच्या ताब्यातून आरोपींनी पलायन करण्याचे प्रकार वाढले आहेत. धारूर ठाण्यातून ‘मोस्ट वॉन्टेड’ विलास बडे याने पलायन केले होते. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्यातून  एका आरोपीने पलायन केले होते. रविवारी पहाटेही कुंटणखाना चालविणारी आँटी शिवाजीनगर ठाण्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. तिचा शोध लागण्यापूर्वीच पुन्हा ज्ञानोबाने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. या सर्व घटनांवरून आरोपींच्या पलायनाचे प्रकार वाढले असून, बीड पोलिसांसाठी तो चिंतेचा विषय ठरला आहे.कर्मचा-यांच्या हलगर्जीपणा; बीड पोलिसांची बदनामीएकीकडे बीड पोलीस गुन्हे शोधण्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर आहेत; तर दुसरीकडे काही कर्मचा-यांचा हलगर्जीपणा व कामचुकारपणा खात्यासाठी घातक ठरत आहे. या एक-दोघांमुळेच संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे.

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलBeedबीड