शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

७२ वर्षांनंतर मामला तलावाने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:22 IST

वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची गडद छाया : मात करण्यासाठी प्रशासन सज्ज; २५० फुटापर्यंत खोदकाम करूनही बोअरवेल कोरडेच...!

वडवणी : वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे.शहरासह व तांडे वस्तीमधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी मामला तलावातून पाणी पुरवठा केला जात आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत नगण्य पाऊस झाल्याने तलावात पाणी साठा अपुरा आहे. भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने दीड महिन्यांपासून तलावातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह असल्याने आतापासूनच बोअर घेणाºया गाड्या शेतात फिरू लागल्या आहेत. पाणी पातळी खालावल्याने खोदकाम करताना २०० ते २५० फुटापर्यंत केवळ धुराळाच उडत आहे.तालुक्यात कधी नव्हे ते या वर्षी पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण घटल्याने पाणी पातळी कमालीची घटली आहे. शेतकºयांच्या हातातून खरीप व रबी अशी दोन्ही हंगाम गेल्यात जमा आहेत, फळबागा, इतर बागायती पिके अल्पश्या पाण्यावर तग धरून होती; मात्र तेही यावर्षी नष्ट झाली आहेत, भविष्यात हे बागायती क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. शेतकºयांची आशाही वेडी असते, जमिनीत पीक येवो अथा न येवो, तो पेरणी करतोच. त्यानंतर पाण्याच्या आशेने खोलवर विहीर, बोअर घेण्याचे त्याचे कार्य सुरूच असते.यावर्षी जानेवारी महिन्यातच सर्वच पाणी साठ्यांनी तळ गाठला, तर काही पूर्णपणे आटले आहेत. शेतकºयांनी आहे ते बागायती पीक व जनावरांना जगवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, दरवर्षी फेब्रुवारी, मार्चनंतर येणाºया परप्रांतीय गाड्या परिसरात नोंव्हेबरमध्येच अवतरल्या. त्यांचीही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी पाणी लागेल या आशेने बोअर घेत आहेत. ९०० फुटापर्यंतही बोअर घेऊन फारसे पाणी लागत नसल्यान, तसचे काही बोअर कोरडे जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकूणच या वर्षी पाणी प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे.या दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून, त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा मंगल मुंडे यांनी सांगितले.१७ प्रस्ताव दाखल : दोन टँकर कार्यरतशहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १७ टॅकर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून फक्त ६ टॅकर प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यापैकी २ टॅकर कार्यान्वित झाली आहेत.मंजूर टँकरपैकी ४ अजूनही अद्यापही दाखल झाले नाहीत.६ टॅकरच्या प्रत्येकी ३ खेपा प्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख टी.व्ही. रांजवण यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई