शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थिती नसेल तर अ‍ॅक्शन घेणार; बीड जि.प.च्या सीईओंचा पहिल्याच दिवशी दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:48 IST

जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्‍या तब्बल २१ कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्‍या तब्बल २१ कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. पदभार स्वीकारल्यानंतर येथील प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

बीड : जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्‍या तब्बल २१ कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. पदभार स्वीकारल्यानंतर येथील प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सीईओ अमोल येडगे २०१४ च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहेत. या आधी ते कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी, नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी या पदांवर कार्यरत होते. बीड जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. पदभार घेताच आज त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्या परिषदेच्या कामांची सद्य स्थिती जाणून घेतली. तसेच सांघिक भावनेतून कसे काम करायचे याबाबत सर्व कर्मचा-यांना सूचना दिल्या. 

प्रशासन गतिमान करण्यास प्राधान्य बीडमध्ये काम करणे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यासोबतच शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासासाठी प्रशासनाकडून चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील. येथे पायाभूत सुविधेसह कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशासन गतीमान करण्याचे आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘उपस्थिती नसेल तर अ‍ॅक्शन’ येडगे यांनी पदभार स्वीकारताच सकाळी नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, खोकरमोहा जि. प. शाळा व अंगणवाडी तसेच शिरुर पंचायत समितीला अचानक भेटी दिल्या. तेथे गैरहजेरीबरोबरच अंतर्गत स्वच्छतेचा अभाव दिसून आला. राजुरी प्रा. आरोग्य केंद्रात ६ तर शिरुर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सोनवणे  यांच्यासह १५ कर्मचारी गैरहजर आढळले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ‘उपस्थिती नसेल तर अ‍ॅक्शन’ अशा शब्दात त्यांनी दांडीबहाद्दरांना इशारा दिला. 

हार, बुकेऐवजी पुस्तकेपदभार स्वीकारल्यानंतर स्वागतामध्ये हार व बुकेंचा स्वीकार न करता यडगे यांनी पुस्तकांचा स्वीकार केला. पुस्तके शाळांना भेट देण्यासाठी तसेच वाचनासाठी उपयोगात येतील असे ते म्हणाले. या माध्यमातूनच ४० आश्रमशाळां व ८१ फिरत्या वाचनालयांना आपण सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBeedबीड