शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:24 IST

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एन. एस. शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.

बीड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एन. एस. शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.अधिक माहिती अशी की, ९ आॅक्टोबर २०१६ रोजी बीड तालुक्यातील तळेगाव शिवारात पीडित मुलगी तिच्या शेतातील बोअरची मोटर चालू करण्यासाठी गेली असता तिला नदीकडे ओढून विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर पीडित मुलीने अंगद लाखे नामक व्यक्तीकडे जात मदत मागितली. अंगद लाखे यांनी तिला घरी सोडले व तिचे आजी, आजोबा, आई आणि चुलते यांना घटनेची माहिती दिली. त्याच दिवशी रात्री आरोपीविरुद्ध पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन बप्पाजी उर्फ बप्पा बाबुराव बागलाने विरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) व कलम ८ आणि १२ अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी.एस.ढगारे यांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपींविरु द्ध दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीची, तिच्या आईची तसेच तपासी अंमलदाराची साक्ष, कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन करून तसेच जिल्हा सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बाप्पा बाबुराव बागलाने यास कलम ३५४ व कलाम ३५४ (अ) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक मोरे व हेकॉ जाधव यांनी मदत केली .

टॅग्स :BeedबीडMolestationविनयभंगCourtन्यायालय