बीड : शहरासह इतर ठिकाणी घरफोड्या, दरोडा, चोरीच्या घटना दिवाळीची सुटी व त्यानंतरच्या महिन्यात घडल्या होत्या. याचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरु असून विविध गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान ६ डिसेंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने विविध ७५ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अटक केली. त्याचकडून चोरीचा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे.शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी हा पेठ बीड भागात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि भारत राऊत यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ सूचना देऊन पेठबीड परिसरातून भीमा लक्ष्मण मस्के याला अटक केली. यावेळी मस्के याच्यावर ७५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिवाजीनगर हद्दीत झालेल्या चोरीच्या घटनेतील १ मोबाईल भिमाकडून हस्तगत केला. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी शिवाजीनगर ठाण्याच्या ताब्यात दिले. त्याला न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या इतर साथिदारांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप, नशीर शेख, साजेद पठाण, सिद्धीकी, सखाराम पवार व चालक राजवीर वंजारे यांनी केली.अनेक गुन्हे होणार उघडविविध घरफोड्या, चोऱ्या यासह इतर गुन्हे या अटकेमुळे उघड होण्याची शक्याता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. तसेच लक्ष्मण मस्के याने मागील ४ वर्षापासून गुन्हगारीपासून दूर होता. मात्र, पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
विविध ७५ गुन्हे दाखल असणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:32 IST
शहरासह इतर ठिकाणी घरफोड्या, दरोडा, चोरीच्या घटना दिवाळीची सुटी व त्यानंतरच्या महिन्यात घडल्या होत्या. याचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरु असून विविध गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेतले आहेत.
विविध ७५ गुन्हे दाखल असणारा आरोपी जेरबंद
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई । विविध गुन्हे उघड होण्याची शक्यता; दोन दिवसांची कोठडी