शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी हातकडीसह फरार; ड्रोन कॅमेर्‍याद्वारे दऱ्याखोऱ्यात पोलीस घेतायत शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:14 IST

अंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांनी परिसरातील छोटी गावे, डोंगर काढला पिंजून

- नितीन कांबळे कडा ( बीड) : अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून हातकडीसह गुरुवारी सायंकाळी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली आजे. ड्रोनच्या सहाय्याने डोंगरदऱ्यात आरोपीचा शोध सुरु आहे. विकास कैलास गायकवाड असे फरार आरोपीचे नाव आहे. गारमाथा येथे लघुशंकेसाठी पोलिसांची गाडी थांबली असता आरोपी गायकवाड फरार झाला होता. 

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील विकास कैलास गायकवाड याच्यावर २०१९ साली एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा अंभोरा पोलिस ठाण्यात नोंद आहे. तेव्हापासून आरोपी गायकवाड फरार होता. बुधवारी २९ रोजी अंभोरा पोलिसांनी त्याला एका ठिकाणाहून ताब्यात घेऊन गुरूवारी ३० रोजी  बीड न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवली. पोलीस आरोपी गायकवाडला बीडवरून अंभोरा पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. सायंकाळी बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील पाटोदा तालुक्यातील गारमाथा येथे लघुशंकेसाठी पोलिसांनी गाडी उभा केली. पोलिस बेसावध असल्याची संधी साधत आरोपी विकास गायकवाड हातकडीसह फरार झाला. 

पोलिसांना शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही. त्यानंतर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह १५ ते २० अंमलदार, २० पोलिस मित्र रात्रीपासून आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, आज दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस डोंगरात आरोपीचा शोध घेत आहे. गुरूवारी रात्री आरोपीवर अंभोरा पोलिस ठाण्यात पोलिसांना चकवा देऊन पळाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

डोंगरदऱ्या, परिसर काढला पिंजून पोलिसांनी आरोपीच्या शोधात डोंगरकिन्ही, उंबरहिरा, तांबा राजुरी, चुंबळी परिसर पिंजून काढला आहे. तसेच येथील लहान मोठे डोंगर, गावे अंभोरा पोलिसांनी पिंजून काढली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी आरोपीची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करा असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी