बीड : गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांसह अन्य चौघे जखमी झाले. ही अपघाताची घटना बीड तालुक्यातील उखंडा तलावाजवळ नगर रोडवर १७ मार्च रोजी पहाटेच्या वेळी घडली. यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड येथील सपोनि. अशोक धांडे, पोहेकॉ. राजेंद्र शिंदे, चालक प्रताप घोडके रात्री गस्त घालण्यासाठी उखंडा मार्गे जात होते. उखंडा येथील तलावाजळ चाराची (एम.एच.२३ एफ.०९००) व मुंबईहून बीडकडे येणाऱ्या दुसरी चारचाकी या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अशोक धांडे, राजेंद्र शिंदे, चालक प्रताप घोडके व समोरील चारचाकीमधील उमा मोरे, उद्धव लक्ष्मण मोरे, तेजस मोरे, आनंद मोरे हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांच्यासह जयंत वाघ, शिवराज धांडे, हेमंत वाघ, पंकज धांडे, श्याम धांडे, अजिंक्य धांडे, गणेश झुंगुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.
===Photopath===
170321\5605172_bed_35_17032021_14.jpg
===Caption===
अपघातातील पोलिसांची चारचाकी