शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात डीएचओंना शिवीगाळ; कारवाई करा अन्यथा राज्यातील आरोग्य सेवा बंद करू, डीएचओ संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:43 IST

वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डवले यांना काेरोना चाचणी शिबीरावरून देवळी-पुलगाव विधासनभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांनी कॉल करून शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने तात्काळ मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आदींनी पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेळीच यावर दखल घेतली नाही तर राज्यात कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

बीड : वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना आमदार रणजीत कांबळे यांनी शिवीगाळ केली. याचे पडसाद सोमवारी पूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणाचा निषेध करण्यासह आमदारांवर कारवाई करावी, अन्यथा राज्यातील सर्व आरोग्य सेवा बंद करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी स्ंघटनेने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविले आहे. शिवीगाळ प्रकाराने मात्र राज्यातील आरोग्य विभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाची महामारी सुरू आहे. यात सर्वात पुढे होऊन आरोग्य विभाग काम करत आहे. वर्षभरापासून अधिकारी, कर्मचारी सुट्टी न घेता २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळे ते तणावात आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी आधार देण्यासह सहकार्य करण्याची गरज आहे. परंतू वर्धा येथे संतापजनक प्रकार घडला आहे. वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डवले यांना काेरोना चाचणी शिबीरावरून देवळी-पुलगाव विधासनभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांनी कॉल करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात येऊन जीवे मारण्याच्या धमकी दिली. हा प्रकार समजताच राज्यातील आरोग्य विभाग आक्रकम झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने तात्काळ मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आदींनी पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेळीच यावर दखल घेतली नाही तर राज्यात कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

बीडमध्येडॉक्टरला मारहाण, पण तक्रारच नाहीचार दिवसांपूर्वी बीडमध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या डॉ.विशाल वनवे यांना पोलिसांनी मारहाण केली होती. परंतू डॉ.वनवे यांनी तक्रार न दिल्याने हे प्रकरण मिटले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता वर्धात चक्क जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी असुरक्षित असल्याचे सिद्ध होत आहे. यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आता सहनशिलता संपली आहेवर्षभरापासून राज्यात सर्वत्रच आमची यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. जीव धोक्यात घालण्यासह तणावात काम केले जात आहे. अशा स्थितीत आम्हाला आधार देण्याऐवजी अपामानास्पद वागणूक देण्यासह शिवीगाळव जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता आम्ही शांत बसणार नाहीत. संंबंधित आमदारांवर कडक कारवाई झाली नाही तर राज्यातील सर्व आरोग्य सेवा बंद करू. आता सहनशिलता संपली आहे.- डॉ.आर.बी.पवार, अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, महाराष्ट्र

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीडagitationआंदोलन