शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

मुख्याध्यापकाचे अपहरण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:41 IST

शाळेतील शिक्षकाला कर्तव्यावर असतांना अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम दशरथ वाघमारे, संतोष वाघमारे (रा.अंथरवन पिंपरी) याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड : शाळेतील शिक्षकाला कर्तव्यावर असतांना अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम दशरथ वाघमारे, संतोष वाघमारे (रा.अंथरवन पिंपरी) याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात अंथरवन पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव रंगनाथ तिडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बीड तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथील शाम दशरथ वाघमारे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येवून विनाकारण व्हिडीओ चित्रण करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, महिला शिक्षकांना मानसिक त्रास देवून अपमानीत करत असे. याप्रकरणी गावातील काही ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधिताला समजावून सांगूनही हे प्रकार थांबले नाही. उलट शाम दशरथ वाघमारे याने दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी त्याचा साथीदार संतोष वाघमारे यांनी, शाळेत येवून चहा प्यायला चला, असे म्हणून बाहेर बोलावून घेतले. बाहेर उभ्या असलेल्या एम.एच.४६ एपी ४३२२ या चारचाकीमध्ये जबरदस्तीने धमकावून बसविले आणि घेवून गेला. गाडीत बसल्यानंतर मारहाण करून मुलाचे अपहरण करीन, तसेच पोलिसात तक्र ार दिली तर जीवे मारीन, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या.दरम्यान अंथरवन पिंपरी ग्रामस्थ पाठलाग करीत असल्याचे पाहून मला गाडीतून खाली उतरविले. वाघमारे याने दिलेल्या धमकीमुळे मी घाबरलो असल्याने उशिराने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापक सदाशिव रंगनाथ तिडके यांनी फिर्यादित नमूद केले आहे.यांसदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी भादंवि कलम ३५३, ३३२, ३६३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भूतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी