शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा पोलीस दलातर्फे शुक्रवारी ‘आॅकेथॉन’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 23:57 IST

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या प्रकरणामुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण होते. २७ वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर या दिवशी सर्व समाजात एकोपा आणि सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘युनिटीथॉन’ या ‘आॅकेथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देहर्ष पोद्दार : एकोपा, सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

बीड : ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या प्रकरणामुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण होते. २७ वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर या दिवशी सर्व समाजात एकोपा आणि सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘युनिटीथॉन’ या ‘आॅकेथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.६ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १० वाजण्याच्या दरम्यान शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदान (मल्टीपर्पज) येथे कार्यक्रम होणार आहे. ७ वाजता आॅकेथॉनला सुरुवात होऊन सहभागी नागरिक चालत बशीरगंज, राजुरी वेस, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, साठे चौक मार्गे पुन्हा मैदानावर येणार आहेत. आॅकेथॉनच्या सुरुवातीला १९९२ साली पात्रूड येथे झालेल्या दंगलीत शहीद झालेले फौजदार साहेबराव राजाराम बाबर यांचे कुटुंबीय हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी विविध संघटना व मंडळांचा प्रमाणपत्रे व रोपटे देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. यावेळी विविध धर्माचे धर्मगुरु सर्वांना मार्गदर्शन करुन एकोपा टिकवण्यासाठी आवाहन करणार आहेत. अयोध्या निकालानंतर बीड जिल्ह्यातील नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू दिला नाही. तसेच नागरिकांनी विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवून सर्वांगीण विकास करण्यास मदत केली आहे. हीच भावना कायम ठेवत नागरिकांनी या आॅकेथॉन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले आहे.गणेश मंडळांना पुरस्कारगणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था ज्या मंडळांनी अबाधित राखली व पोलीस प्रशासनास सहकार्य केले तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले अशा जिल्हाभरातील गणपती मंडळांना जिल्हा पोलीस दलातर्फे पुरस्कार देण्यात येणार होते. परंतु निवडणूक व इतर काही कामांमुळे ते लांबणीवर पडले. हा कार्यक्रम आॅकेथॉन रॅलीनंतर छत्रपती संभाजी महाराज मैदानावर होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडPoliceपोलिस