बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शनिवारी जिल्ह्यातील १३२४ गावांतील शेतकºयांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २० हजार पात्र शेतक-यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केले होते. दरम्यान आतापर्यंत ३५९ शेतकºयांच्या कर्जखात्यावर २ कोटी रुपये जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.शनिवारी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकºयांची यादी प्रसिद्ध झाली. तत्पूर्वी ६५५ जणांची यादी प्रसिद्ध झाली होती. एकूण १३२४ गावातील शेतक-यांची यादी त्या- त्या गावात, बॅँक, सोसायटी, सीएससीवर डकविल्या आहेत. शनिवारी दुपारपासून रविवारी रात्रीपर्यंत जवळपास २० हजार शेतकºयांनी आधार प्रमाणीकरण करुन घेतले. त्यानुसार त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतक-यांनी यादीतील नाव पाहून विशेष क्रमांक व आवश्यक कागदपत्रांसह सीएससी किंवा आपले सरकार केंद्रावर तातडीने आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी केले.
२० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:35 IST
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शनिवारी जिल्ह्यातील १३२४ गावांतील शेतकºयांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २० हजार पात्र शेतक-यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केले होते.
२० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
ठळक मुद्देबीड : १३२४ शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द