शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बीड जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच नाहीत !

By अनिल भंडारी | Updated: March 19, 2024 18:00 IST

शाळांचे दुर्लक्ष : आधार-यूडायसची माहिती जुळणे आवश्यक

बीड : जिल्ह्यातील ४० हजार ८४ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिड नसल्याची माहिती मिळाली असून  खासगी  अनुदानित शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष यानिमित्ताने समोर आले आहे. ३१ मार्चपर्यंत आधार व्हॅलिड न  केल्यास  १ एप्रिलपासून संबंधित विद्यार्थ्यांना आता शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्याच्या वित्त  विभागाने याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. 

शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ मे २०२२ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचाां डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्नीकृत करण्यात यावा. तसेच पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बाल विकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करूनच संबंधित योजनांना निधी वितरित करण्यात यावा, असे या निर्णयात म्हटले होते. 

१ एप्रिलपासून मिळणार नाहीत लाभशासनाच्या विविध विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभधारक, लाभार्थींचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के ३१ मार्च २०२४ पर्यंत  करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. ही कार्यवाही शंभर टक्के करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या सचिवांवर राहणार असून शंभर टक्के कार्यवाहीनंतर हमीपत्र सादर करावे लागणार आहे.  आधार कार्ड व्हॅलीडची कार्यवाही शंभर टक्के न झाल्यास संबंधित योजनांचा निधी १ एप्रिल २०२४ पासून वितरित करण्यात येणार नसल्याचे या निर्णयात म्हटले आहे. 

व्हॅलिड कसे समजायचे? आधार कार्डवरील नाव, जन्मतारखेत चूक किंवा नावातील स्पेलिंगमध्ये चूक असली तर ते आधार कार्ड इनव्हॅलिड ठरते. त्यामुळे आवश्यक कार्यवाही शाळांना करावी लागणार आहे. आधारवरील स्पष्ट नोंद शाळांनीयू-डायसमधील माहितीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय आधार व्हॅलिड समजले जात नाही.

आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येवरच अनुदानजिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ४० हजार ८४ विद्यार्थ्यांचे आधार असलेतरी ते व्हॅलिड नसल्याची बाब समोर आली आहे. तर १५०६४ विद्यार्थ्यांची नावे आहेत, परंतु त्यांचे आधारकार्डच जोडलेले नाहीत. आधार व्हॅलिड विद्यार्थीसंख्येवरच यापुढे शाळांना अनुदान मिळणार आहे.

कार्यवाही पूर्ण झाली नाहीशासनाने दिलेल्या मुदतीत ३१ डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत व त्यानंतर आजपर्यंत आधार कार्डशी संलग्न करण्याची (आधार व्हॅलीड) कार्यवाही शंभर टक्के पूर्ण झाली नाही. त्यामुळे वित्त विभागाने ४ मार्च रोजी यासंदर्भात आदेश दिले.

खासगी शाळांत इनव्हॅलिडचे प्रमाण जास्त खासगी अनुदानित शाळा-१८४७४जिल्हा परिषद शाळा ८१३८स्वयंअर्थ साहय्यित शाळा - ६९८०

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डEducationशिक्षणStudentविद्यार्थी