शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

भाऊबीजेची ओवाळणी अर्धवट राहिली; पुण्याहून गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:04 IST

आष्टी तालुक्यात चार दिवसात दुसरी घटना

- नितीन कांबळे कडा ( बीड): भाऊबीजसाठी पुण्याहून आपल्या गावाकडे मोटारसायकलवर जात असताना आष्टी तालुक्यातील चिंचपूरजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. तर दुचाकीवरील एकाला अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दिवाळी निमित्त पुण्यावरून गावाकडे जात असतांना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळील वळणावर बुधवार २६ रोजी राञी साडेसातच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठिमागून धडक दिल्याने मोटार सायकल (एमएच 12 पीएक्स 6728 ) यावरील आदेश किसन काळे (वय 32) रा.सोनेगांव,धनेगांव ता.जामखेड हा जागीच ठार झाला आहे. तर नवनाथ मच्छिंद्र काळे (36, रा.मोशी,ता.हावेली,जि.पुणे ) हा गंभीर जखमी झाला असून अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पो.हे.काॅ.विकास राठोड यांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड हे करत आहेत.

चार दिवसातील दुसरी घटनागेल्या चार दिवसापुर्वीच पुण्यावरून परभणी येथे दिवाळी साठी जात असलेल्या तरूणांचा आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे अपघात होऊन मृत्यू झाला होता.या घटनेला चार दिवस होते ना होतेच आज पुन्हा दुसरी घटना घडली आहे.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Beedबीड