शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत वाढलेल्या कुस्तीपटूस सुवर्णाचा 'तुरा'! बीडच्या सनी फुलमाळीचा बहरैनमध्ये पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:02 IST

सनीचे वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

- नितीन कांबळेकडा (बीड): अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत एका मराठमोळ्या तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढवला आहे. आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळी याने बहरैन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. झोपडीत वाढलेल्या सनीचा हा प्रवास कोणत्याही स्वप्नवत कथेपेक्षा कमी नाही, जिथे परिस्थितीवर मात करून त्याने यशाचे शिखर गाठले आहे.

सनीचा परिवार गेली १५ वर्षे लोहगाव परिसरात एका झोपडीत वास्तव्यास आहे. सनीचे वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशी परिस्थिती असतानाही सनीने हार मानली नाही. आजोबा आणि वडिलांनाही कुस्तीची आवड होती, पण आर्थिक अडचणींमुळे ती थांबवावी लागली. वडिलांचे स्वप्न होते की मुलांनी पैलवान व्हावे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना (भैय्या, बादल आणि सनी) स्वतः प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पैशांअभावी वडिलांनी झोपडीजवळच्या माळरानावर तात्पुरती मातीची तालीम उभारली आणि मुलांचा सराव सुरू केला. सध्या दहावीत शिकणाऱ्या सनीने महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आता आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने देशाचा गौरव वाढवला आहे.

वस्ताद ठरले 'देवदूत'सनीच्या जिद्दीला योग्य मार्गदर्शन मिळाले नसते, तर त्याचे स्वप्न अपुरे राहिले असते. रायबा तालीमचे वस्ताद पै. सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांनी त्याला सुरुवातीला मार्गदर्शन केले. पुढे लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये वस्ताद संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनी परिपक्व झाला. वस्ताद भोंडवे यांनी सनीला दत्तक घेऊन त्याचा कुस्तीचा सर्व खर्च उचलला आणि त्याचे भविष्य घडवले.

ग्रामीण तरुणांना प्रेरणाआमदार सुरेश धस यांनी सनीचे कौतुक करताना म्हटले, "अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणं ही मोठी कामगिरी आहे. सनीने आपल्या मेहनती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आष्टीचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्याचे यश ग्रामीण तरुणांना प्रेरणा देणारं आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Slum-raised wrestler wins gold, showcasing triumph over adversity in Bahrain.

Web Summary : Beed's Sunny Phulmali, raised in poverty, won a gold medal in Bahrain's Asian youth wrestling competition. Overcoming financial hardships with his family's support and guidance from coaches, he achieved international success, inspiring rural youth.
टॅग्स :BeedबीडWrestlingकुस्ती