शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील ८४० बोगस पीकविमाधारकांकडून तब्बल ७८ लाख रुपये होणार वसूल

By शिरीष शिंदे | Updated: March 18, 2025 19:54 IST

कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात यासंबंधीचे पत्र नुकतेच पाठविले आहे.

बीड : शासकीय जमिनी, बोगस सातबारा, करारनामा न देणाऱ्या ८४० बोगस पीकविमाधारकांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी ३४० जणांना ३४ लाख वितरित झाले असून ५०० जणांच्या खात्यावर ४४ लाख रुपयांची विमा रक्कम जमा होत आहे. सदरील ८४० बोगस पीकविमाधारकांकडून सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात यासंबंधीचे पत्र नुकतेच पाठविले आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना हा बोगस विमा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता.

खरीप-२०२३ च्या हंगामामध्ये दलाल, सीएससी चालकांनी ३३५७ जणांच्या नावे बोगस पीकविमा भरला असल्याचा आरोप करत आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली होती. त्यानुसार भारतीय कृषी पीकविमा कंपनीने पडताळणी केली असता, ३३५७ विमा अर्जांपैकी २२८४ विमा अर्ज पूर्वीच नाकारले होते. तर १०७३ अर्ज ‘एआयसी’ने मंजूर केले होते. १०७३ अर्जांपैकी २३३ अपात्र ठरले होते. त्यामुळे एकूण ८४० विमा अर्ज मंजूर झाले होते. त्यामुळे सदरील बनावट अर्जदारांना नुकसानभरपाई रक्कम अदा करण्यात आलेली आहे. सदरील नुकसानभरपाई रक्कम बँक खात्यावर ताबडतोब जमा करण्याकरिता जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समितीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना सूचित करावे, जेणेकरून राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडून प्राप्त विमा हप्ता अनुदान राज्य व केंद्र शासनास परत करता येईल, असे कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना वसुलीसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

असे आहे वर्गीकरणबनावट सातबारा असणारे ७४ अर्ज, शासकीय जमीन दाखवून भरलेले ५२१, जमीन नावे नसल्याचे प्रमाणापत्र भरलेले १७, करारनामा स्टॅम्प पेपरवर न देणार ७० तर करारनामा प्रमाणापत्र न जोडणारे १५८ असे एकूण ८४० बनावट पीकविमा भरणारे आहेत. या ८४० बोगस पीकविमाधारकांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी ३४० जणांना ३४ लाख वितरित झाले असून, ५०० जणांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होत आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत ते होल्ड करून उर्वरित बनावट लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील.

महसूलचा पुढाकार आवश्यकबनावट शेतकऱ्यांनी पीकविमा भरून तब्बल ३४ लाख रुपये लाटले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची बैठक घेऊन याबाबत सर्वांना सूचना करणे आवश्यक आहे. तसेच अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संबंधितांना नोटीस देणे आवश्यक आहे. अन्यथा एवढी मोठी रक्कम वसूल होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडCrime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या