शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

भरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली; कारमधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:15 IST

चालकाच्या प्रसंगावधानाने बस रस्त्याच्या बाजूच्या २० फुट खोल खड्ड्यात जाण्यापासून वाचून मोठा अनर्थ टळला.

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केज तालुक्यातील माळेगाव शिवारात शनिवारी (दि. 12 )  पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या बसवर भरधाव वेगातील अनियंत्रित कार धडकली. यात कार मधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी झाले असून बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने बस रस्त्याच्या बाजूच्या २० फुट खोल खड्ड्यात जाण्यापासून वाचून मोठा अनर्थ टळला.

हिंगोली आगाराची बस ( क्रमांक एमएच 14 बीटी 2529)  45 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून हिंगोलीकडे  निघाली होती. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान माळेगाव बस थांब्या जवळील वळणावर तुळजापूर येथे  देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची भरधाव कार ( क्र. एमएच 46 बीबी 1769) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे  बसवर समोरून धडकली. यात कारमधील हनुमंत चिंतामण पांचाळ ( 28 वर्षे) सुधाकर भीमराव वाकूरे ( 30 वर्षे) विलास मधुकर वाघमारे (25 वर्षे), संतराम  माधव जावडे (40 वर्षे, चौघेही रा  शुक्लेश्वर निंबगाव ता माजलगाव) हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर बसमधील चार प्रवाशीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच युसूफवडगाव  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, जमादार महादेव केदार व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले. 

माळेगावचे  युवक मदतीला धावलेमाळेगाव येथील युवक बळीराम लोकरे, कमलाकर गव्हाणे, दत्ता गव्हाणे, राम चिरके, ज्ञानेश्वरी गिरी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या चौघांना कारचा दरवाजा तोडून बाहेर काढले. त्यानंतर चारही जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात  पाठविण्यात आले.

बस चालकाच्या दक्षतेमुळे हानी टळलीकोल्हापूर येथून हिंगोलीकडे जाणारी बस माळेगाव बस थांब्याजवळ येताच समोरून येणारी कार बसवर धडकली. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग नियंत्रित करण्यात यश मिळविले. अन्यथा बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळून मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे बसमधील 44 प्रवासी बालंबाल बचावले. 

कारमधील चौघेही मद्यधुंद अपघातात कार चकनाचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच मदतीला धावलेल्या युवकांनी जखमीना नाव, गाव विचारले असता मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे कोणालाही नीट बोलता येत नव्हते, अशी माहिती मदतीला धावून आलेल्या युवकांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड