शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार वळणावर ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:44 IST

अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर कार ट्रकच्या समोरील भागाच्या खाली घुसली.

- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील कोरेगाव शिवारातून जाणाऱ्या महामार्गावरील पुलाच्या वळणावर आज पहाटे साडेपाच वाजता कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. गणेश त्रिंबक गावंडे (48, हरीकिशन सोसायटी ,मलकापूर जि बुलढाणा) असे मृताचे नाव आहे.

नांदुरा ( जि बुलढाणा) येथील सुखदेव बंडुजी ढोकरे हे गणेश त्रिंबक गावंडे याच्या भाड्याच्या कारने ( क्रमांक एम एच 28 / ए झेड 1164) लातूरला जात होते. तर लातूर येथून टोमॅटोचा माल घेऊन एक ट्रक ( क्रमांक एम एच 09/ सीयु 8182 ) सुप्याकडे जात होता. दरम्यान, आज पहाटे साडेपाच वाजता तालुक्यातील कोरेगाव पुलावरील वळणावर भरधाव वेगातील कारचा ताबा चालकाकडून सुटला. कारने समोरून येणाऱ्या ट्रकला समोरून जोरदार धडकली दिली. यात कार चालक गणेश त्रिंबक गावंडे (48, हरीकिशन सोसायटी ,मलकापूर जि बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला. तर सुखदेव बंडुजी ढोकरे हे गंभीर जखमी आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघातानंतर ट्रकचालक अपघातस्थळावरून पसार झाला. जमादार दत्तात्रय बिक्कड यांनी पंचनामा केला. नगर येथील शिवशंभो ट्रान्सपोर्ट ही मालट्रक असून संतोष बाळासाहेब मगर यांच्या मालकीची आहे.

जेसीबीने कार बाहेर काढली अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर कार ट्रकच्या समोरील भागाच्या खाली घुसली. रुग्णवाहिका चालक अर्जून बारगजे आणि शाकेर शेख यांनी घटनास्थळी जात जेसीबीस बोलावून ट्रक खाली घुसलेली कार बाजुला काढली. त्यानंतर कारचा दरवाजा तोडून चालक आणि जखमींना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे चालक गावंडे यास तपासून मृत घोषित करण्यात आले. तर गंभीर जखमीस अधिक उपचारासाठी लातूर येथे रवाना करण्यात आले. मृत चालक गणेश गावंडे यांच्या पश्चात तीन भाऊ, भावजयी, आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड