शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एक लिटर पाणी २० रुपयास अन् दुधाला भाव २५; ताळमेळ जुळत नसल्याने दूध उत्पादक संकटात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:42 IST

यावर्षी तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे मार्च महिन्यातच चारा व पाणीटंचाई निर्माण झाली.

- नितीन कांबळेकडा : शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय म्हणून बघितल्या जाणाऱ्या दूध उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. दूध उत्पादन शुल्क अधिक आणि दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

यावर्षी तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे मार्च महिन्यातच चारा व पाणीटंचाई निर्माण झाली. अनेक ठिकाणी तलाव कोरडेठाक पडले आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांना लागणारा हिरवा चारा पाण्याअभावी जळून गेला आहे. हिरवा चारादेखील विकत घ्यावा लागत आहे. एक लिटर दुधाला जवळपास २२ रुपये उत्पादन खर्च आहे. मात्र, दुधाला केवळ २४ ते २५ रुपये लिटर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात तुटपुंजे पैसे हातात पडतात.

आष्टी दूध उत्पादनात मराठवाड्यात होते अव्वलमराठवाड्यात सर्वांत जास्त दूध उत्पादन आष्टी तालुक्यात होत असे. सुशिक्षित, बेरोजगार, युवकांना नोकऱ्या लागत नसल्याने ते शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे वळले. मात्र, सध्या दूध उत्पादन घसरल्याने याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे.

उत्पादन शुल्क, दुधाच्या दरातील तफावतप्रकार, दर, प्रमाणभुसा - २४००, १ क्विंटलसरकी पेंड - ३१००, १ क्विंटलपत्री पेंड - ५०००, १ क्विंटलवैरण - ४३००, शेकडागोळी पेंड - ३७००, १ क्विंटल ऊस - ३३००, १ टन ----

एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात. मात्र, एक लिटर दुधाचे शेतकऱ्यांच्या हातात २५ रुपये येतात. मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. अनेक गावांत जनावरांच्या पाण्याची टंचाई आहे. हिरवा चारा, मजुरी, ढेप यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागतात. एक लिटर दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना २० ते २२ रुपये खर्च येताे.

टॅग्स :BeedबीडmilkदूधAgriculture Sectorशेती क्षेत्र