शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उसाच्या फडातून बिबट्या बाहेर निघाला अन् थरकाप उडाला; शेतकऱ्यांत दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:08 IST

अंबाजोगाई तालुक्यातील पूस आणि जवळगाव शिवारात खळबळ

अंबाजोगाई : शहरालगतच्या बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्यांत गेल्या दहा वर्षांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. परंतु बुधवारी बिबट्याने अंबाजोगाई तालुक्यातील पूस आणि जवळगाव शिवारात अचानक आपले दर्शन दिल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहरालगत असलेल्या बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्यांत गत दहा वर्षांत या भागातील नागरिकांनी अनेकदा बिबट्या पाहिला. या बिबट्याने अनेक वेळा म्हशी, शेळ्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या. तर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला होता.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणमागील काही वर्षे बिबट्याच्या दर्शनाची चर्चा बंद झाली होती. मात्र बुधवारी रात्री जवळगाव-पूस शिवारात बिबट्या उसाच्या फडातून बाहेर निघतानाचे दृश्य अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तेलघणा परिसरातही आढळले ठसे !याच परिसरातील तेलघणा शिवारातही बिबट्याच्या पावलांचे ठसे हरभऱ्याच्या पिकात उमटल्याची चित्रफीत अलीकडेच व्हायरल झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रत्यक्ष बिबट्यानेच दर्शन दिले असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात बालाघाटच्या डोंगरदऱ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या संपूर्ण परिसरात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. दहा वर्षांपूर्वी बुट्टेनाथ परिसरात जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. यानंतर मात्र येल्डा परिसरात दिसलेल्या बिबट्याला वनविभागाने जाळे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या तावडीतूनदेखील तो सुटला.

बिबट्या पुन्हा सक्रिय !या घटनेला बराच काळ लोटल्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई तालुक्यात बिबट्या सक्रिय झाल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधून बिबट्याच्या वावराची कल्पना दिली. त्यानुसार अंबाजोगाईच्या वनपाल विजया शेंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पूस व जवळगाव परिसरात जाऊन त्या भागाची पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांना भीतीचे कारण नाही, असे सांगून बिबट्या दिसताच वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना केले आहे.

स्वरक्षणासाठी साहित्य वापरावेपूस व जवळगाव शिवारात बिबट्याचे पाऊलठसे उमटल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात बिबट्या असल्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्वरक्षणासाठी शेतात जाताना कुऱ्हाड, विळा, गोफण, कोयता, काठ्या या वस्तूंचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा. -- विजया शिंगोटे, वनपाल, अधिकारी

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforest departmentवनविभागAgriculture Sectorशेती क्षेत्र