शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळी गर्भपात प्रकरण: गर्भ अक्षरशः खेचून बाहेर काढणारा सापडला; एक नातेवाईकही अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:43 IST

पहिली मुलगी असल्याने दुसरी ही मुलगी नको, असे म्हणून कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भपात केला

परळी (बीड): येथील शिवाजीनगरमधील एका विवाहितेचे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून  गर्भपात केल्याप्रकरणी संभाजीनगर स्टेशनच्या पोलिसांनी बार्शी येथील तथाकथित डॉक्टरास मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून विवाहितेचा पती व सासू हे दोघेजण अद्याप ही फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी तीन पथके नियुक्त केली आहेत.

पहिली मुलगी असल्याने दुसरी ही मुलगी नको, असे म्हणून कुटुंबीयांनी तथाकथित डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून बार्शीच्या तथाकथित डॉक्टरने गर्भपाता दरम्यान गर्भ अक्षरश:  ओढून बाहेर काढला. या प्रकरणी संभाजीनगर स्टेशनच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे नातेवाईक प्रकाश कावळे यास अटक केली. त्यानंतर तथाकथित डॉक्टर नंदकुमार स्वामी यास बार्शी येथून पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, पोलीस सचिन सानप व  गोपीनाथ डाके यांनी ताब्यात घेतले. 

काय आहे घटना शहरातील 22 वर्षे विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केला व येथील शिवाजीनगर भागात 16 जुलै रोजी घरीच एका डॉक्टरला बोलावून गर्भलिंग निदानकरून गर्भपात केला. त्यानंतर विवाहित महिला पुण्यात भावाकडे गेली. विवाहितेने पुणे येथील कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून हा गुन्हा कोंढवा पोलीस ठाणे येथून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलाचे पती नारायण वाघमोडे ,सासू छाया  वाघमोडे, प्रकाश कावळे ( सर्व रा. परळी ) व  डॉ. नंदकुमार स्वामी (रा बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेवर सध्या पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड