शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By सोमनाथ खताळ | Updated: May 22, 2024 19:18 IST

तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी घेतली लाच

बीड : गलेलठ्ठ पगार असतानाही माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी येथील कार्यकारी अभियंत्याने सात शेतकऱ्यांकडून २८ हजार रुपयांची लाच मागितली. तीच स्वीकारताना त्याला त्याच्याच कक्षात बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

राजेश आनंदराव सलगरकर (वय ३५, ह.मु. रा. अंबाजोगाई, मूळ मिरज, जि. सांगली) हा परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो वर्ग १ चा अधिकारी आहे. तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्यांचे मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी मिळावी, यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज केला होता. ती देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये याप्रमाणे सात जणांचे ३५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे २८ हजार रुपये घेण्याचे ठरले. 

याची तक्रार एसीबीकडे येताच त्यांनी बुधवारी खात्री केली. त्यानंतर सापळा लावला. सलगरकर याने स्वत: आपल्या कक्षातच हे २८ हजार रुपये घेतले. या वेळी त्याला लगेच बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे आदींनी केली.

एकाच दिवशी दोन कारवायाबीडमध्येही नगररचनाकार प्रशांत डाेंगरे याच्यासह नेहाल शेख आणि नीलेश पवार या दोन खासगी अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाइन अर्जाला मंजुरी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील १५ हजार रुपये घेण्याचे निष्पन्न झाले. यामध्ये नेहाल व नीलेश यांना बेड्या ठोकल्या असून डोंगरे फरार आहे. या सर्वांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प