शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ९९.५२ टक्के पेरण्या पूर्ण मात्र पावसाने ओढ दिल्याने पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:40 IST

संपूर्ण जिल्ह्यात ९९.५२ टक्के खरीप पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९.५२ टक्के खरीप पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जून महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. मात्र जुलै महिन्यात देखील वरूणराजाची कृपा झाली नाही. त्यामुळे अल्प पावसावर जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा पूर्ण झाला आहे. मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जुलै महिनाअखेर आले तरी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटलेलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची मुळे जमिनीमध्ये खोलवर रूजतात. मात्र, ओलावा कमी होत असल्यामुळे वाढ खुंटून पिके सुकू लागली आहेत. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

कृषी विभागाच्या सल्ल्याने करा उपाययोजनाढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळोवेळी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.वेळेवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली तर, पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण व किडीचा प्रादुर्भाव रोखता येईल. तसेच पुढील आठ ते दहा दिवस पावसाने ओढ दिली तरी देखील पिके न सुकता तग धरू शकतील, असे मत बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व शिरुर तालुका कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी व्यक्त केले. कडधान्यांपेक्षा कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना पावसाची अधिक आवश्यकता असते. जमिनीतील ओल कमी झाल्यामुळे पिकांना मिळणारे आवश्यक मूलद्रव्ये कमी पडत आहेत. त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकांवर औषधांची फवारणी करावी.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस