शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:50 IST

काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत.

- विनोद ढोबळेविडा (ता.केज) : जावई म्हटले की मानपान... लाड आणि सरबराई ओघाने आलीच; पण बीड जिल्ह्यात एक गाव असेही आहे जेथे धुळवडीला जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. केज तालुक्यातील विडा या गावाने ९० वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांपासून या परंपरेत खंड पडला होता. यंदा पुन्हा ही परंपरा पूर्ववत सुरू होणार असल्याने विड्याच्या जावयांनी चांगलाच धसका घेतला आहे.

हजारावर उंबरे व सात हजार लोकसंख्येचे विडानिजाम राजवटीत जहागीरदारीचे गाव म्हणून ओळखले जाई. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली (जि. लातूर) येथील मेहुणे धूलिवंदनाच्या दिवशी विड्याला आले होते. त्यांचा खास पाहुणचार केला गेला. मात्र, तेव्हा गावातील कर्त्या मंडळींनी त्यांची थट्टा मस्करी करून चक्क गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही कायम आहे. काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत. रंगांची उधळण करीत हलगीच्या तालावर थिरकणारी तरुणाई व आबालवृद्धांंचा सहभाग यामुळे या परंपरेची परिसरात भलतीच उत्सुकता असते. १८ मार्च रोजी जावयाची गर्दभ मिरवणूक काढण्यासाठी गाढवापासून ते जावयापर्यंत शोधाशोध सुरू झाली आहे. गोविंद देशमुख, नारायण वाघमारे, महादेव पटाईत, शहाजी घुटे, रावसा पटाईत आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.

ना वाद ना विवादविड्यातील या अनोख्या परंपरेला आता ९० वर्षे होत आहेत. मात्र, एकदाही भांडण-तंटे झाले नाहीत. विशेष म्हणजे गर्दभ मिरवणुकीसाठी सर्व जाती-धर्माच्या जावयांना आतापर्यंत मान मिळालेला आहे. जाती-धर्मापेक्षा तो गावचा जावई आहे ना... बस्स एवढीच एक अट असते. त्यामुळे सर्वांचा सहभाग असतो. यातून सामाजिक सलोखा व एकोपाही जपला गेला आहे.

दोन वर्षांनंतर यंदा मिरवणूक जावयाची गाढवावरून मिरवणूक काढल्यानंतर त्यांचा मंदिरात अहेर देऊन सन्मानही केला जातो. दोन वर्षांनंतर यंदा मिरवणूक काढली जाणार असून, तरुणांमध्ये उत्साह आहे. जावयाच्या शोधासाठी दोन टीम पाठविल्या आहेत.- सूरज पटाईत, सरपंच, विडा

टॅग्स :Holiहोळी 2022Beedबीड