शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

९ ऊसतोड मजूर महिलांवरच गर्भाशय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:05 IST

गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. यामध्ये ५६ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले.

बीड : गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. यामध्ये ५६ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले. पैकी केवळ नऊच महिला उसतोड कामगार आहेत. इतर महिला या गावातच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ उसतोडणीला जाण्यासाठीच गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, हे यावरून स्पष्ट होते.२९१ घरे आणि एकूण १८१६ लोकसंख्या असलेल्या वंजारवाडी गावात २१५ महिला आहेत. याच गावात ५६ महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. प्रत्येक महिलेची आशा सेविकेने ‘वन टू वन’ माहिती घेतली. अर्ज भरून घेतला. यामध्ये केवळ ९ महिलाच उसतोडणीला जात असल्याचे समोर आले.४९ महिला या उसतोड कामगार नसल्याचे दिसून आला. हाच अहवाल आरोग्य विभागाने समितीला दिला. राज्ययस्तरीय चौकशी समितीलाही या महिलांनी हीच माहिती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.यामुळे गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया४पिशवीची गाठ असल्याने ६, अंगावरील लाल जाणे १५, अंगावरील पांढरे जाणे १३, पोटदुखी ९, पिशवीला सूज १२, इतर १ या कारणांमुळे ५६ शस्त्रक्रिया झाल्या.४२५ ते ३० वयोगटात १, ३५ ते ४० - ६, ४० ते ५० - २०, ५० ते ६० - १९ व ६० च्या पुढील १० महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या.या रूग्णालयात झाल्या शस्त्रक्रियाबीड भगवान हॉस्पीटलमध्ये सर्वाधिक २४ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यानंतर ओस्तवाल हॉस्पिटल २, कृपाळू हॉस्पिटल ३, वीर हॉस्पिटल ५, शिरपूरकर हॉस्पिटल २, अपेक्स हॉस्पिटल १, सांगली सिव्हील हॉस्पिटल १, ग्रामीण रूग्णालय रायमोहा १, जिल्हा रूग्णालय बीड ६, लहाने हॉस्पिटल ५, धूत हॉस्पिटल २, हुबेकर हॉस्पिटल १, तिडके हॉस्पिटल १, घोळवे हॉस्पिटल २ अशा एकूण ५६ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल