शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:17 IST

तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

बीड : जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणूकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

गुंडगिरी करुन दहशत निर्माण करणाऱ्या  लोकांविरुध्द कायदेशीर कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणे प्रमुखांना दिले. त्यानुसार अंबाजोगाई ग्रामीणचे उपनिरीक्षक एस.डी.भोकाणे यांनी परमेश्ववर उर्फ बाळासाहेब नारायण जाधव, जीवन मोहन अंधारे, युवराज माणिक चव्हाण व शेख मंजुर शेख यासीन (सर्व रा.घाटनांदूर ता.अंबाजोगाई) यांच्यासह उपनिरीक्षक एस.यु.जाधव यांनी शेख एजाज शेख इसाक, दगडू बापु शेरेकर, नागनाथ गोविंद लामतुरे (सर्व रा.घाटनांदूर) या दोन टोळ्यांविरुध्द मटका जुगाराचे गुन्हे असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ प्रमाण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवले होते. 

याशिवाय गेवराईचे तत्कालीन पो.नि.दिनेश आहेर यांनी मालाविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या अविनाश कल्याण धुरंधरे (रा.मादळमोही ह.मु.तेलगाव नाका,बीड) व लहु सुभाष हातागळे (रा.काळा हनुमान ठाणा, बीड) यांच्याविरुध्द प्रस्ताव तयार केला होता. घाटनांदूरच्या प्रस्तावाची अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी तर बीडमधील प्रस्तावाची उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी चौकशी करत या लोकांना हद्दपार करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांकडे केली. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूका शांततेत पार पडाव्यात या दृष्टीने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस