शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये वन महोत्सवात लावलेली ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:59 IST

कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.

कृषी दिनानिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान जिल्हाभरात वन महोत्सव सप्ताह साजरा झाला. यावर्षी जिल्ह्याला १२ लाख ८२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट वन विभागाने पूर्ण केले. शिवाय जास्तीची ५ लाख झाडेही लावली. राज्यात तिसऱ्या क्रमाकांवर बीड जिल्हा होता. लावलेली झाडे जगविण्यासंदर्भात प्रत्येक शासकीय कार्यालयासह संस्थांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतल्याचे सध्यातरी कागदावरील आकड्यांवरुन पाहवयास मिळत आहे. वनविभागाने जिल्हाभरात ४२ ठिकाणी ६ लाख ८० हजार झाडे लावली होती. पैकी ६ लाख ६८ हजार झाडे जगली आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात लावण्यात येणाºया रोपवाटिकेची गुरूवारी अमोल सातपुते, वनपाल दावणे यांनी पाहणी केली.यांचा उद्दिष्टपूर्तीकडे कानाडोळाप्रत्येक शासकीय कार्यालयास झाडे लावण्यासंदर्भात उद्दिष्ट दिले होते. मात्र, जायकवाडी पाटबंधारे विभाग, माजलगाव पाटबंधारे विभाग तसेच बीड आणि अंबाजोगाई येथील तिन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने ही उद्दिष्टपूर्ती केलीच नाही. त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. खुलाशात त्यांनी पुढच्या वर्षी अधिक झाडे लावण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर यावर्षी कठोर कारवाई झाली नाही, असेही सूत्रांकडून समजते.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्षझाडे जगविण्यात ग्रामपंचायत कार्यालय कुचकामी ठरत आहे. त्यांची टक्केवारी ७१ टक्के आहे, तर कृषी विभाग, जलसंधारण, बांधकाम व नगरपालिका यांची टक्केवारी ६८ टक्के आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यात ८० टक्के झाडे जगविली आहेत.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीforestजंगल