शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत विनापरवाना रॅली व डॉल्बीचा वापर प्रकरणी ७५  जणांवर गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 16:10 IST

रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

अंबाजोगाई : रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यावेळी डीजे डॉल्बी सिस्टीमसहित एक टेम्पो जप्त करण्यात आला.

शहरात १६ मार्च ते २९ मार्च दरम्यान जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही रामनवमीच्या आदल्या दिवशी काही तरुणांनी शहरातून विनापरवाना मोटारसायकल रॅली काढली. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास संपूर्ण शहरातून निघालेल्या या रॅलीत राजकुमार ऊर्फ बाळा गायके, गोविंद शिंपले, शुभम भारत लखेरा, अमीत जाजू, रुपेश पाथरकर, स्वप्निल धायगुडे, प्रविण भाकरे, गजानन सुरवसे, ऋषी लोमटे, ओम खंदारे, महेश अंबाड, बबलू केंद्रे, अभिमन्यू वैष्णव, आकाश होळकर, अशोक खामकर, शर्मा यांच्यासोबत अज्ञात ५० ते ६०  बाईकस्वार सहभागी होते.या दरम्यान पोलिसांनी गायके याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता त्याने परवाना घेतला नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांनी अभिमान भालेराव यांच्या फिर्यादीवरून एकूण ७५ जणांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला.

बेकायदेशीर डीजे डॉल्बीचा वापर रामनवमी निमित्त मोठी शोभायात्रा निघाली होती. या मिरवणुकीत पूर्णवेळ बेकायदेशीर डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता पाटील चौकातून मिरवणूक सुरु झाल्यापासून एका टेंपोवर (एमएच २३ - २१०१) लादलेली डॉल्बी सिस्टीम आवाज मर्यादेचे उल्लंघन करून मिरवणूक संपेपर्यंत सुरु होती. यावेळी पोलिसांनी टेंपोचालक दीपक सुधीर जाधव यास हटकले असता त्याने सदरील सिस्टीम सतीश उर्फ बबलू उत्तमराव केंद्रे याच्या मालकीची असल्याचे सांगितले. रात्री १० वाजताची मुदत उलटूनही कर्कश्श आवाजात डॉल्बी सुरूच होती. या प्रकरणी सहा. फौजदार गजानन तडसे यांच्या फिर्यादीवरून वरील ११ जण आणि गाडीच्या चालक-मालकावर अंबाजोगाई शहर पोलिसात कलम १८८, २९१, ३४ आणि म.पो. का. कलम १३१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. यावली डीजे डॉल्बी सिस्टीमसहित टेंपो जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तडसे करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाmusicसंगीतtwo wheelerटू व्हीलरAmbajogaiअंबाजोगाई