शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

By सोमनाथ खताळ | Updated: May 27, 2025 12:41 IST

बीड पोलिसांकडून समुपदेशन; पाच महिन्यांत १७४ विवाहितांच्या पोलिसांत तक्रारी

बीड : तू दिसायला चांगलीच नाहीस, तुला काही येत नाही, तुझ्या आई-वडिलांनी हुंडाच दिला नाही, यांसारख्या कारणांनी १७४ विवाहितांनी पोलिसांकडे धाव घेतली. यात समुपदेशन करून ६६ जणींचे संसार जोडण्यात आले. तर, आणखी १०८ जणींना पोलिसांकडून ‘भरोसा’ मिळणे बाकी आहे. तडजोड झालेल्या प्रकरणांतील अनेक विवाहितांनी आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, पोलिसांनी ‘भरोसा’ दिल्याने त्या मृत्यूच्या दारातून परत आल्या आहेत.

सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली होती. यातील आरोपी हे राजकीय असल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले. विरोधकांनीही टीका केली, परंतु अशाच वैष्णवी प्रत्येक जिल्ह्यात सासरच्या छळाला वैतागल्या आहेत. त्यामुळेच त्या पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेतात. बीडमध्ये अशा विवाहितांसाठीच भरोसा सेल कार्यरत आहे.

काय करतोय भरोसा सेल ?विवाहितांची तक्रार घेतली जाते. त्यानंतर आठवडाभरात तिच्या पतीसह सासरच्या लोकांना बोलावून घेतले जाते. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर दोघांनाही बोलावले जाते. समोरासमोर बसवून समस्या जाणून घेत समुपदेशन केले जाते. अनेक प्रकरणात पहिल्याच तारखेत तडजोड होते. तर काही प्रकरणात चार पाच वेळा बोलावून घेतल्यावर तडजोड होते. ज्यात होत नाही, अशावेळी विवाहिताला पत्र देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पाठविले जाते.

काय आहेत कारणे ?तुला स्वयंपाक बनवता येत नाही, तुला मुलच होत नाही, तू काळीच आहेस, घर बांधण्यासाठी, व्यावसायासाठी, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, लग्नात हुंडाच दिला नाही, मानपान दिला नाही, तुझे बाहेर अनैतिक संंबंध आहेत, तू फोनवरच सारखे बोलतेस, तू मोबाइल वापरू नकोस, तू आई-वडिलांना बोलायचेच नाहीस, तू माझ्या आई-वडिलांना मानपान देत नाहीस, उलटच का बोलतेस? असे विविध कारणे विवाहितांच्या छळाची आहेत.

विवाहिता का करतात आत्महत्या?सासरच्या लोकांचा सततचा त्रास आणि माहेरच्या लोकांना त्रास नको, म्हणून विवाहिता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलात. परंतु, असे न करता छळ होत असल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे तक्रार करावी. येथे समुपदेशनाने तडजोड केली जाते. यामुळे अनेक विवाहिता आत्महत्याचा विचार डोक्यातून काढत असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस २४ तास तत्परभरोसा सेलमध्ये तक्रार येताच दोघांना बोलावून घेत समुपदेशन केले जाते. त्यांच्यात तडजोड व्हावी, हाच पोलिसांचा उद्देश असतो. यात आम्हाला यश येत आहे. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. प्रत्येक समस्याला मार्ग असतो. पोलिस आपल्यासाठी २४ तास तत्पर आहे.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

२०२५ मधील आकडेवारीएकूण अर्ज १७४तडजोड - ६६प्रलंबित - १०८

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याsexual harassmentलैंगिक छळdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदा