शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ््यात सुरु होणार ६५० टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा; पाणीपुरवठा करणारे सर्व प्रकल्प कोरडेठाक

बीड : जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात पाणीपुरवठा करण्यासाठी ६५० टँकर सुरु होणार आहेत.एप्रिल ते जून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ९०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यान दुष्काळी कालावधी संपल्यामुळे व जून महिन्याच्या शेवटी तरी मोठा पाऊस पडेल ही अपेक्षा असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र, जुलै महिन्याची १३ तारीख आली तरी देखील मोठा पाऊस न झाल्यामुळे, पुन्हा ग्रामीण भागातून टँकरची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांमधून टँकरची आवश्यकतेनुसार मागणीचे प्रस्तवा मागवले होते. त्यानूसार सर्व तालुक्यांनी पुन्हा एकदा जवळपास ६५० टँकरची मागणी केली आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भर पावसाळ््यात ६५० टँकर सुरु होणार आहेत. तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे सर्व छोटी- मोठी धरणे देखील कोरडी पडली आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना कायम आहे.भविष्यकाळाची घोर चिंताजिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे छोटे-मोठे १४४ प्रकल्प कोरडेठाक आहेत. माजलगाव धरणात गोदापात्रातून पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, इतर ठिकाणी नद्या कोरड्या असल्यामुळे मोठा पाऊस पडेपर्यंत प्रकल्प कोरडेठाक राहणार आहेत. मोठा पाऊस पडला नाही तर पुढील काळात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई