शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छुल्लक वादातून रागाचा पारा चढला, ६० वर्षांच्या वयोवृद्धाने पत्नीला कुऱ्हाडीने तोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 13:43 IST

Murder in Beed : हत्येनंतर पती मृतदेहाजवळ बसून होता. 

गेवराई (बीड ) : तालुक्यातील गढी-माजलगावं रोडवर असलेल्या खांडवी येथे एका ६० वर्षीय वयोवृद्धाने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. किरकोळ वादातून ही हत्या  झाल्याची माहिती असून आरोपी पती पिराजी शेजूळ यास पोलिसांनी अटक केली आहे. 

संजीवनी पिराजी शेजूळ ( ५५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. पिराजी शेजून हे खांडवी येथे राहतात. त्यांना विवाहित दोन मुळे आणि तीन मुली आहेत. आज पहाटे छुल्लक कारणावरून त्यांचा पत्नी संजीवनी सोबत वाद झाला. रागाच्या भरात पिराजी यांनी कुऱ्हाडीने पत्नी संजीवनीच्या डोके आणि हातावर वार केले. यात संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पिराजी मृतदेहाजवळ बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कसलेच भाव नव्हते अशी माहिती आहे. 

सकाळी शेजारी खोलीमधील मुले बाहेर आली असता त्यांना हे धक्कादायक चित्र दिसले. हत्येची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रविद्र पेरगुलवार,डि.बी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे,विठ्ठल देशमुख,गणेश नागरे,अशोक सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पिजारी शेजूळ यास अटक केली असून अद्याप गुन्हाच्या नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड