शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ११ विलगीकरण केंदे्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:20 IST

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरही आता आरोग्य विभाग नजर ठेवून असणार आहे. अशा व्यक्तींसाठीच आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन) स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग सतर्क : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची घेणार काळजी, गर्दीत जाण्याचे टाळा...

बीड : कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरही आता आरोग्य विभाग नजर ठेवून असणार आहे. अशा व्यक्तींसाठीच आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन) स्थापन करण्यात येणार आहे. बीडमध्ये याची अंमलबजावणीही करण्यात आली असून या ११ केंद्रांत जवळपास ६०० लोकांची काळजी घेतली जाऊ शकते, असे सूत्रांकडून समजते. कोरोनाबाबत आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.कोरोनाचे रुग्ण राज्यातही आढळण्यास सुरूवात झाली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून नजर ठेवून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत. अशातच बीडमधीलही तिघे १ मार्च रोजी दुबईहुन परतले आहेत.आरोग्य विभागाने त्यांच्याही तपासण्या केल्या असून अद्यापही संपर्कात आहेत. हे तिघेही पुण्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या विमानात होते, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विशेष नजर ठेवली आहे.दरम्यान, हाच धागा पकडून अशा संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी वस्तीपासून थोड्या अंतरावर स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहेत. बीडमध्ये भगवान बाबा प्रतिष्ठानजवळ जागेची पाहणी केली असून आणखी दोन ठिकाणी हे केंद्र होणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक केंद्र निर्माण केले जाणार असून जागेची शोधाशोध केली जात आहे.प्रत्येक केंद्रात ५० पेक्षा जास्त नागरिक राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.या सर्वांना खाणे, पिणे, झोपणे, मनोरंजनाची व्यवस्था आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. तसेच नियमित व्यायामही करून घेतला जाणार आहे. विशेष पथकाद्वारे (मैत्रीपूर्ण वातावरणात) त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.घाबरू नका, संयम बाळगाकोरोनाच्या आजाराबद्दल काही प्रमाणात खरे असले तरी त्यापेक्षा जास्त अफवाही पसरविल्या जात आहेत.काही दिवसांपूर्वीच सिरसाळ्यात रुग्ण आढळल्याची अफवा पसरली होती. आरोग्य विभागाने सर्व खात्री करून ही अफवा असल्याचे सांगितले होते. नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये, सर्वांनी संयम बाळगावा, काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस