शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात चारा पिकांमध्ये १० वर्षांत ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:47 IST

जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देनगदी पिकांचा पेरा वाढल्याने : चारा टंचाईचा करावा लागतोय सामना

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच पेरा कमी झाल्यामुळे ज्वारी, बाजरीसह इतर धान्याचे भाव देखील वाढले आहेत.बीड जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ८ लाख ६६ हजार २२५ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील लागवडीखाली ७ लाख २७ हजार ५२३ हेक्टर एवढे आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचा पेरा वाढल्यामुळे इतर पारंपारिक पिकांचा पेरा घटला आहे. २००९ ते २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ४५ ते ५० घट खरीप व रब्बी ज्वारी, मका व इतर पारंपारिक पिक लागवडीमध्ये घट झाली आहे. मागील दहा वर्षात दर एका वर्षाआड पडणारा दुष्काळ व बदललेली पिकपद्धती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील पशुधन १२ लाखाच्या जवळापास आहे. मात्र, चारा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी ६०३ चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत.मागील १० वर्षात बदलेल्या पिकपद्धतीमुळे शेतीची उत्पादनक्षमता देखील कमी होत असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नगदी पिकांमुळे शेतीला पुरक असलेला दूध व्यवसाय संपुष्टात आला आहे. तसेच उत्पादन क्षमता व पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळेव शेतीच्या कमासाठी यंत्राचा वापर वाढल्यामुळे जनावरे कमी झाले आहेत. त्यामुळे चारा व इतर पारंपारिक पिकांना फाटा देऊन नगदी पिकांच्या पेरा अधिक होत आहे. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळत आहे. तसेच बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा कमी होत असल्यामुळे किंमत वाढ आहे. याचा परिणाम नागरिकांच्या धान्य खरेदीवर होत आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी पारंपारिक पिकांचा पेरा केला पाहिजे असे मत कृषी विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले.शेतकºयांची आर्थिक स्थिती बिघडलीपुर्वी पाशुधन पुरक पिकपद्धती होती मात्र, मागील काही वर्षात जनावरांची संख्या घटली व नगदी पिके घेण्यावर भर दिला गेला आहे.त्यामुळे शेणखतातून मिळणारे मुलद्रव्य कमी झाले व त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.त्यामुळे शेतकºयांनी शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसाय केला पाहिजे तसेच पुन्हा एक दा नवतंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपारिक पिकपद्धतीचा अवलंब देखील करणे गरजेचे आहे.यामुळेच शेतीमधील उत्पादन वाढेल व शेतकरी समृद्ध होईल असे मत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ