शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

श्रींना महानैवैद्याची ४८ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:00 IST

शेगाव राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बीड शहरात ४८ वर्षांपासून आगमन होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेगाव राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बीड शहरात ४८ वर्षांपासून आगमन होत आहे. शहरातील पेठ बीड भागातील विठ्ठल मंदिर संस्थानमुळे बीडकरांना हा भक्तियोग जुळून आलेला आहे. शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानने देखील पत्रव्यवहारातून हे ऋणानुबंध जपले आहेत.संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्ष आहे. पंढरपूरहून पालखी सोहळा शेगावकडे जाताना बीड शहरात न येता पेंडगावमार्गे प्रस्थान होते. १९७० साली विठ्ठल मंदिर संस्थानचे वै. पांडुरंग महाराज पुजारी यांनी शेगांव संस्थानचे त्यावेळचे अध्यक्ष गोपाळराव पाटील यांना भेटून पालखी सोहळा बीड शहरातून प्रस्थान होण्यासाठी आग्रह धरला.त्यानंतर १९७१ पासून श्रींच्या पालखी सोहळ्याचे बीड शहरात आगमन आणि दर्शनाची भाविकांना संधी उपलब्ध झाली. विठ्ठल मंदिरातच पालखीचा मुक्काम असे, नंतर जागा अपुरी पडत असल्याने काही वर्षे शुक्रवार पेठेतील बार्शीकर मिलच्या मोकळ्या जागेत पालखीचा मुक्काम होता. या जागेत निवासी बांधकाम झाल्याने शहराचे ग्रामदैवत कनकालेश्वर मंदिर परिसरात पालखीचा मुक्काम निश्चित झाला. या परिसरात पालखी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शनासाठी पालखीतील वारकरी तसेच शहरातील श्री भक्त स्वयंसेवकांची भूमिका पार पाडतात. परिसराला जत्रेचे स्वरुप येते.शेगाव संस्थानच्या श्री गजानन महाराज पालखीचे मंगळवारी (दि.२३) बीड शहरामध्ये आगमन होत आहे.,दुपारी बारा वाजता पेठ बीड भागातील बालाजी मंदिर परिसरात व्यापारी बांधवांतर्फे पालखीचे स्वागत आणि महाआरतीचे आयोजन केले आहे.भाविकांनी महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.पालखी सोहळा शहरातून सुरु झाल्यापासून विठ्ठल मंदिरमार्गे नेला जातो. मंदिरात पालखी येताच पूजा, आरतीनंतर पूरणाच्या महानैवेद्याची परंपरा आजही आहे. मंदिरात होणारा हा चैतन्यदायी सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. ४८ वर्षांपासून ही परंपरा संस्थानने जपल्याचे एकनाथ महाराज पुजारी यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजReligious Placesधार्मिक स्थळे