शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' शिवसैनिकाच्या कुटुंबीयांना शिवसेना नेत्याकडून 5 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 22:47 IST

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

ठळक मुद्देसुमंत रुईकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. घरातील कमावता गडी गेल्याने त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार गेला. त्यामुळेच, सुमंत यांच्या कुटुंबाला आता शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे

बीड/मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाले आहे. या शिवसैनिकाच्या घरी जाऊन शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांत्वन केले. तसेच, पीडित कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही केली. 

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या बीड शहरात हळहळ व्यक्त केली. तर, राज्यभरातील शिवसैनिकांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. 

सुमंत रुईकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. घरातील कमावता गडी गेल्याने त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार गेला. त्यामुळेच, सुमंत यांच्या कुटुंबाला आता शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रुईकर यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी खैरे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. सुमंत रूईकर यांच्या पत्नी ह्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेत नोकरीला आहेत. किर्ती रूईकर यांना तांत्रिक अडचणी बाजूला सारून नोकरीत कायम करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्दही यावेळी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी दिला. तसेच, रुईकर यांच्या कुटुंबाला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनीही घरी जाऊन आर्थिक मदत केली.

तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच मृत्यूसुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. 1 डिसेंबरला ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावे यासाठी रुईकर चालत जात होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपतीला पोहचण्याचा संकल्प होता. पण, ताप आल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वीही केली होती पायी यात्रासुमंत रुईकरांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमंत रूईकर यांनी यापूर्वी 2019 मध्ये उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती पायी यात्रा केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांचा कौतुक करत सत्कार केला होता.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीडMumbaiमुंबईChandrakant Khaireचंद्रकांत खैरे