शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

३५१ छावण्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : आठ दिवसांत खुलासा करण्याचे प्रशासनाचे आदेश

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील ३५१ चारा छावण्यांना नोटीस देण्यात आली असून ८ दिवसांत योग्य खुलासा न दिल्यास चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाने मोर्चा आता दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी वळवला आहे. छावण्यांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमनूक करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. तर काही ठिकाणी अधिकारी चिरीमिरी घेऊन योग्य तपासणी करत नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकारी स्वत: लक्ष घालून चारा छावण्यांची तपासणी करणार आहेत. नियमांनूसार छावणीवर व्यवस्था करण्यात आलेली नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनावरांची संख्या कमी असताना जास्तीचा अहवाल पाठवणे, एक दिवसाआड पशुखाद्याचे वाटप न करणे, योग्य नोंदी नसणे, जनावरांवर नंबर नसणे यासह इतर त्रूटी आढळून आल्यामुळे ३५१ चारा छावणी चालकांना नोटीस दिली आहे. तसेच ८ दिवसांमध्ये योग्य खुलासा न दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या छावण्यांना अधिकाऱ्यांकडून अभयचारा छावण्यांचे चालक हे बहूतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाºयांकडून कार्यवाही केली जात नाही.अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी काही दिवसांपुर्वी म्हाळस जवळा, मांजरसुंबा, आष्टी, शिरुर, येथील काही चारा छावण्यांची तपासणी केली होती. त्यावेळी जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. मात्र, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे पदाधिका-यांच्या छावण्यांना वेगळा नियम प्रशासकीय अधिकाºयांनी लावला आहे का असा प्रश्न इतर चारा छावणी चालक विचारु लागले आहेत.तहसीलदारांचा अजब फतवाशिरुरच्या तहसीलदारांनी आदेश काढून तलाठ्यांनी चारा छावण्या तपासायच्या नाहीत असा अजब फतवा काढला होता.त्यांनी काही चारा छावण्याची तपासणी केली तेथे सर्व व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. तर त्याच छावणीची अपर जिल्हाधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर १५६ पेक्षा अधिक जनावरांची तफावत दिसून आली.त्यामुळे काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाºयांना छावण्यांमधून भ्रष्टाचाराचे कुरण मिळाले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र