बीड : जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात खरीप हंगामात ९५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५६ हजार १२८ शेतकºयांनी पीक कर्ज घेतले. १५ राष्टÑीयीकृत आणि व्यावसायिक तसेच दोन खाजगी क्षेत्रातील बॅँकांकडून पीककर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामात ५६ हजार १२८ शेतकºयांना मागणीनुसार ३८९ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. हे प्रमाण ४१.०२ टक्के इतके होते.जून ते सप्टेंबरपर्यंत अनियमित व अपुरा पाऊस असुनही पिके चांगली आली होती. तर दसºयादरम्यान अनेक शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. गहू, हरभरा आणि ज्वारी या मुख्य पिकांचा यात समावेश आहे. खरीप हंगामाततून चांगले उत्पन्न होईल असा विश्वास निर्माण झालेला असताना आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने ही पिके उद्ध्वस्त केली. जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठे खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले. जेथे रबीचा पेरा झाला तेथे दुबारचे संकट उभे राहिले. शेतांमध्ये पाणी राहिले, काही ठिकाणी शेतं वाहून गेली.पाऊस चांगला झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकºयांनी उघडीप मिळताच शेतीची कामे सुरु केली आहेत. रबीचा पेरा केलेल्या शेतकºयांना आधी उगवलेली व पावसामुळे नासलेली पिके काढावी लागत आहेत. शेतकºयंपुढे शेतीसाठी खर्च करायची चिंता असलीतरी शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.
रबीसाठी ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले ४७ कोटींचे पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:01 IST
जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामासाठी ४७ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले असून पात्र शेतकºयांना मागणी होताच कर्ज वितरणाची कार्यवाही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रबीसाठी ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले ४७ कोटींचे पीककर्ज
ठळक मुद्देअनेक शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीला दुरुस्त करण्यात जिल्ह्यातील शेतकरी व्यस्त