शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर परिसर विकासाठी १३३ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:18 IST

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना दिली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांचे आश्वासन : वैद्यनाथ मंदिर परिसर विकास, पर्यटन विकासास गती देणार; वैद्यनाथांचे घेतले दर्शन

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना दिली.धनंजय मुंडे यांनी रविवारी सकाळी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन कामास सुरूवात केली. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंत्री धनंजय मुंडे यांचा श्री वैद्यनाथाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देवून व फेटा बांधून मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परळीकरांचा नागरी सत्कारावेळी उत्साह पाहून आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे, परळीकराच्या अपेक्षा मोठ्या आहेत, त्या पुर्ण करण्यात येतील व विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्दही वैद्यनाथाच्या मंदिरात धनंजय मुंडे यांनी दिला आहे.प्रारंभी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथास अभिषेक करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विपीन पाटील, सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा.प्रदीप देशमुख, नंदकिशोर जाजू, शरद मोहरीर, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख यांच्यासह बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, चंदूलाल बियाणी, सुरेश टाक, शिवकुमार व्यवहारे, नंदकिशोर तोतला, ओमप्रकाश तापडिया, गोविंद देशमुख, राजेश्वर चव्हाण, अभय मुंडे, राजेंद्र सोनी, डॉ.मधुसूदन काळे, विजय लड्डा, सारडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा.प्रदीप देशमुख यांनी केले.केंद्राकडे प्रयत्न करणार : मुंडे यांची ग्वाहीप्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग केंद्र सरकारच्या यादीत दर्जा सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे. वेळ पडली तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. यासाठी आपण वैद्यनाथ मंदिराच्या विश्वस्तासोबत राहणार आहोत. त्यांच्या अडचणी शासन पातळीवर सोडविण्यात येईल असे मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून येणारे भाविक परळी शहरात थांबले पाहिजेत यासाठी परळी परिसरातील मंदिराचाही विकास करून पर्यटनाच्या दृष्टीने नवीन योजना आखण्यात येईल, पर्यटनाच्या कामालाही गती देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.वैद्यनाथ मंदिर परिसर विकास कृती आराखड्यासह पर्यटनाच्या विकासाची कामेही त्वरित होण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही मुंडे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेReligious programmeधार्मिक कार्यक्रम