शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये काळ्या बाजारात जाणारे २८०० लिटर रॉकेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:07 IST

अंमळनेर येथील राशन दुकानातून कमी किंमतीत रॉकेल खरेदी करुन बीडच्या काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला.

बीड : अंमळनेर येथील राशन दुकानातून कमी किंमतीत रॉकेल खरेदी करुन बीडच्या काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये २८०० लिटर रॉकेल व पिकअप जप्त करण्यात आले. याप्रकरणी रॉकेल माफियासह तिघांविरोधात पेठ बीड ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे.

बीडमध्ये मागील अनेक महिन्यांपासून शेख जावेद उर्फ बब्बू हा राशनचे रॉकेल खरेदी करुन काळ्या बाजारात विक्री करीत असे. त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. गुरुवारी सायंकाळी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथून एका पिकअपमधून रॉकेल येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपल्या पथकासमवेत सापळा लावला. सपोनि दिलीप तेजनकर यांनी बीड शहरातील इमामपूर रस्त्यावर पिकअपचा पाठलाग करुन जावेदच्या घरी छापा टाकला. त्यामध्ये २८०० लिटर रॉकेल जप्त करण्यात आले. जावेदसह कट्टू नजीर व अब्दुल अलिमोद्दीन यांच्याविरोधातही पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार बालाजी दराडे यांनी फिर्याद दिली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुरवठा विभागाला सोबत घेत पो. नि. पाळवदे, पेठ बीड ठाण्याचे पो. नि. बी. एस. बडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. इतर साहित्याचीही तपासणी करुन बब्बूची गुन्हेगारी क्षेत्रातील पार्श्वभूमी काढली.

कारवाई रोखण्यासाठी फोनाफोनीबब्बू हा अट्टल गुन्हेगार आहे. पेठ बीड पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. त्याला राजकीय पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारी रात्री मात्र राजकीय व्यक्तींनी कारवाई करु नये यासाठी फोनाफोनी न करता चक्क पोलीस विभागातीलच काही अधिकाºयांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. परंतु अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशामुळे शुक्रवारी दुपारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान ‘ते’ अधिकारी कोण ? याबाबत पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसBeedबीडCrimeगुन्हा