शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

कारचे लॉक तोडून औरंगाबादच्या व्यापाऱ्याचे २५ लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 19:12 IST

परळीतील मोंढा येथील मार्केटमध्ये झाली चोरी

ठळक मुद्देवसुली केलेली रक्कम व्यापाऱ्याने कारमध्ये ठेवली होती

परळी : शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबादहून आलेल्या एका व्यापाऱ्याची लॉक केलेल्या कार मधून 24लाख 97 हजार रुपयाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील चोरास पोलिसांनी अटक केलेली नव्हती. 

याबाबत  माहिती अशी की ,औरंगाबाद येथील संजय गंगवाल हे गुरुवारी सकाळी परळी शहरात पेपर कप विक्री व  वसुलीच्या निमित्त्याने आले होते. त्यांनी त्यांची कार मोंढ्यातील श्री हनुमान मंदिर जवळ पाण्याच्या टाकीजवळ लावण्यास वाहन चालकाला सांगितले. यानंतर गंगवाल  हे गाडीतून उतरून एका व्यापाऱ्याकडे गेले. तर चालक गाडी लॉक करून नाष्टास गेला. याच वेळेत कारचे लॉक उघडून चोरट्यांनी आतील पैश्याची व वाहनचालकाची कपड्याची बॅग पळवली.

नाश्ता करून आलेल्या वाहन चालकास कारचे लॉक उघडलेले दिसले. त्याने लागलीच गंगवाल यांना  बॅग चोरीचां प्रकार सांगितला. संजय गंगवाल यांच्या बॅगमध्ये वसुलीची 24 लाख 97 हजार रुपये रक्कम होती. त्यानंतर गंगवाल यांनी परळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक खरात हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड