शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांनी मारल्या २४ शेळ्या; धारूर डोंगरपट्ट्यात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:40 IST

कुत्र्यांनी आता परिसरातील डोंगरपट्टीच्या भागाकडे मोर्चा वळवत जंगली प्राण्यासह पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे.

ठळक मुद्देतीन शेतकऱ्यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसानबंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

धारूर : तालुक्यातील डोंगरपट्ट्यात भटक्या कुत्र्यांची दहशत असून सदरील कुत्री जंगली प्राण्यांसह पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याचे दिसून येत आहे. जहाँगीर मोहा येथील तीन शेतकऱ्यांची २४ शेळ्यांची पिल्ले या कुत्र्यांनी मारल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. 

शहर व तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांनी आता परिसरातील डोंगरपट्टीच्या भागाकडे मोर्चा वळवत जंगली प्राण्यासह पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे. तालुक्यात वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हरिण, ससे, साळींदरसारखे प्राणी व मोर, लांडोर, चित्तरसारख्या पक्षांची संख्या मोठी आहे. या प्राणी व पशूंची शिकार करण्यासाठी पाच ते दहा भटक्या कुत्र्यांची टोळी डोंगरात सक्रिय आहे. या कुत्र्यांनी आता शेळ्यासारख्या पाळीव प्राण्यांनाही लक्ष करणे सुरु केले आहे. 

बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणीतालुक्यातील जहाँगीर मोहा येथील तीन शेतकऱ्यांची तब्बल २४ शेळ्या या कुत्र्यांनी फस्त केल्याचे बुधवारी रात्री  उघड झाले. शहरातील बामदरी, मुहपसारी, नागदरा, मंत्रीदरा परिसरातही कुत्र्यांची दहशत आहे.जहाँगीर मोहा परिसरातील वाघदरा व डोलदरा भागात ४ नोव्हेंबर रोजी १० तर ५ नोव्हेंबर रोजी आठ ते दहा महिने वयाची शेळ्यांची पिल्ले मृत आढळली. जहाँगीर मोहा येथील शामू सीताराम मंदे, बप्पा दादाराव मंदे, आश्रूबा रानबा चिरके या शेळीपालकांचे जवळपास ७० ते ७५  हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करुन शेळीपालकांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :dogकुत्राBeedबीडforestजंगल