जिल्ह्यात सोमवारी ६४८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ६२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २० जणांचे अहवाल कोरोनाबाधित निष्पन्न झाले. या बाधितांमध्ये अंबाजोगाई ५, आष्टी ३, बीड ८, गेवराई, माजलगाव प्रत्येकी १ आणि शिरुर कासार तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७ हजार ६०९ इतकी झाली असून यापैकी १६ हजार ७९५ जण कोरोनामुक्त झाले आहे तर ५५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर आता जिल्ह्यात २६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
२० नवे रुग्ण;२७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST