शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिकांच्या बोगस प्रमाणपत्रावर नौकरी मिळविणारे आरोग्य विभागातील १७ कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 19:32 IST

या कारवाईने इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांनी काढले आदेशबीडमध्ये खळबळ

बीड : स्वातंत्र्य सैनिक असल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडून शेकडो पाल्यांनी नौकऱ्या लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. यावर आरोग्य विभागाने चौकशी करून बीडच्या अस्थापनेवर असणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी हे आदेश काढले. आता इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसताना खोटी कागदपत्रांच्या आधारे  स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण  सन २००३ मध्ये  समोर आले होते. शिवाय, स्वातंत्र्यसैनिक पाल्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घेत १०६ जणांनी जिल्ह्यात नोकऱ्याही मिळवल्या होत्या, मात्र,  हे प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालय व शासनाच्या आदेशानंतर आता या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयातील वर्ग चारच्या आस्थापनेवरील १७ कर्मचाऱ्यांना डॉ. अशोक थोरात यांनी बडतर्फ केले. 

दरम्यान, जुलै २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्र देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचाही निर्णय होता. मात्र याबाबत डॉ.थोरात यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले. वरिष्ठांनी आपण सक्षम अधिकारी असल्याने आपणच यावर कारवाई करावी, असे पत्र दिले. त्यानंतर १३ फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली. यामध्ये दोषी आढळल्याने वर्ग ४ च्या १७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तसेच यामध्ये वर्ग ३ चे आणखी ५ कर्मचारी असल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

इतर विभागातील कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई?जिल्ह्यात १०६ जणांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून नौकऱ्या मिळविल्या. मात्र हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्यांदा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता इतर विभागातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. या कर्मचाऱ्यांनी न्यायालय आणि मॅटचा दरवाजाही ठोठावला होता, असे सूत्रांकडून समजते. 

हे कर्मचारी केले बडतर्फभानुदास एकनाथ उगले (कक्षसेवक), बबन रघुनाथ वनवे (सफाईगार), सुखदेव बाबासाहेब वनवे (सफाईगार), महारुद्र लाला किर्दांत (पहारेकरी), भागवत लोभा वडमारे (कक्षसेवक), द्वारका सुभाष नागरगोजे (प्रयोगशाळा स्वच्छक), परमेश्वर भानुदास जगताप (कक्षसेवक), तुकाराम सूर्यभान जगताप (कक्षसेवक), संगीता विठ्ठल मुळे (बाह्यरुग्ण सेवक), महारुद्र बाबासाहेब वनवे (प्रयोगशाळा परिचर), तात्यासाहेब लक्ष्मण सांबरे (कक्षसेवक), अशोक नानाभाऊ आडसूळ (कक्षसेवक), प्रकाश रघुनाथ बडगे (शिपाई), सुंदरराव दत्तात्रय बडगे (कक्षसेवक), युवराज रघुनाथ शिंदे (कक्षसेवक), प्रल्हाद भीमराव गर्कळ (कक्षसेवक), हनुमंत ज्ञानोबा तुपे (कक्षसेवक) यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर १७ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड 

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडfraudधोकेबाजीEmployeeकर्मचारीBeedबीड