शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधात ठरत होता अडसर, आईनेच केला १४ वर्षीय मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 19:26 IST

पोलिस तपासात उलगडले रहस्य

बीड : प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत असलेल्या १४ वर्षीय मुलाचा त्याच्या आईनेच खून केल्याचा प्रकार पेठ बीड पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरूद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील दाऊदपुरा भागातील २५ जानेवारी रोजी शेख इजान शेख तैवर हा १४ वर्षीय मुलगा बेशुद्ध झाला असल्याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली. शेजाऱ्यांनी इजानला जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पेठ बीड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन पूर्ण केल्यानंतर इजानवर दफनविधी करण्यात आला.

मयत शेख इजान याच्या प्रोव्हिजनल सर्टिफिकेटवर नाक, तोंड व मान कशाच्या तरी साहाय्याने दबल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. या कारणावरून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचा अभिप्राय होता. त्यामुळे घातपात असल्याचे समोर आले. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी तपासामध्ये जबाब नोंदविले असता मयत इजानची आई शेख नाजिया हिचे काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले. तसेच एका २८ वर्षीय तरुणासोबत मागील एक वर्षापासून संबंध असल्याचेही समोर आले. दरम्यान, २५ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता शेख नाजिया हिच्या घरातून आरडाओरडा झाल्याचा आवाज आला तेव्हा दोघांनी दरवाजा ढकलला असता आतून दरवाजा बंद होता. त्यानंतर चौघांनी दरवाजा वाजविला असता शेख नाजिया हिने दरवाजा उघडला असता घरातील कॉटवर मुलगा इजान हा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याला हात लावून जागे करण्याचा प्रयत्न केला असता तो जागा झाला नाही. त्यामुळे दोघांनी त्याला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात नेले असता मयत घोषित केले. शेख इजान याचा शवविच्छेदन अहवाल व त्याची आई शेख नाजिया हिने दिलेला जबाब यामध्ये तफावत आढळून आली.

खोटी दिली माहितीपोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शेख इजानची आई शेख नाजिया हिचे परपुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. मुलगा इजान पाणी प्यायला व बेशुद्ध पडला, असे खोटे सांगितले असल्याचेसुद्धा निष्पन्न झाले. यावरून शेख नाजिया हिने बंद घरामध्ये मुलगा इजान याचा नाक, तोंड व मान कशाच्या तरी साहाय्याने दाबून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून शेख नाजिया शेख तैवर हिच्याविरूद्ध पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मुदीराज तपास करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी