शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आरोपीस १२ वर्षे कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:43 IST

पीडितेचा जबाबासह नऊ साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या

बीड : बीडमधील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी अनिल सुनील पवार (२२) याला १२ वर्षांचा कारावास आणि ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

सुनीलने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ११ मे २०१७ रोजी नळाला पाणी आणण्यास घराबाहेर पडलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अनिलने दुचाकीवरुन पळवून नेले.  हदगाव (ता. परतूर, जि. जालना) येथे नातेवाईकांकडे ते १७ मेपर्यंत राहिले. त्यानंतर अनिल तिला घेऊन हरकी लिमगाव (ता. माजलगाव) येथे पोहोचला. तेथे ते २८ मेपर्यंत राहिले. या दोन्ही ठिकाणी अनिलने तिच्यावर अत्याचार केला. पोउपनि. भूषण सोनार यांनी त्यांचा शोध घेऊन बीडला आणले. दरम्यान, पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर अनिल पवारविरुध्द बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. 

पोउपनि सोनार यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्या. प्राची कुलकर्णी यांनी साक्षीपुरावे व सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अनिल पवारला दोषी ठरवले. बुधवारी त्यास न्यायालयाने १२ वर्षांची शिक्षा व ३ हजार दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अमित हसेगावकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार सी. एस. इंगळे व महिला कर्मचारी सिंगल यांचे त्यांना सहाय्य लाभले. तपासात पोउपनि सोनार यांना रेवणनाथ दुधाने यांनी सहकार्य केले.

पीडितेचा जबाबासह नऊ साक्षी महत्त्वपूर्णया प्रकरणात पीडितेसह वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, पीडितेने ज्या दवाखान्यात जन्म घेतला, तेथील प्रमाणपत्र व डॉक्टरांचा जबाबही महत्त्वाचा ठरला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. 

कोर्टातून केले होते पलायनफेब्रुवारी रोजी अनिलला सुनावणीसाठी पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायालयात आणले होते. याचदरम्यान बंदोबस्तावरील तीन कर्मचाऱ्यांना चकवा देत त्याने न्यायालयात पलायन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेने दहा दिवसांनंतर त्याच्या परराज्यातून मुसक्या आवळल्या होत्या.  

टॅग्स :Rapeबलात्कारLife Imprisonmentजन्मठेपBeedबीडCourtन्यायालय