शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत पुलावरून दुचाकी पडल्याने बारावीचा विद्यार्थी ठार; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:24 IST

लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे

अंबाजोगाई ( बीड ) : लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत प्राप्त माहिती अशी कि, नुकतीच अकरावीची परीक्षा देऊन बारावीच्या वर्गात गेलेले पवन मुंजाजी कनले (वय १७, रा. सोन्ना, जि. परभणी) आणि ऋषिकेश लक्ष्मण गडदे (वय १७, रा. बोधेगाव, ता. अंबाजोगाई) हे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत शहरातील एका अभ्यासिकेत बसून होते. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ते तिथून निघून गेले असे समजते. त्यानंतर रात्रीतून ते बाईकवरून जात असताना  वाघाळा जवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात कोसळली. या अपघातात पवन याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश  हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रस्त्याच्या खूप खाली दोन्ही युवक पडलेले असल्याने त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन जखमी ऋषिकेशला रुग्णालयात हलविले. दरम्यान, हे दोन्ही विद्यार्थी अंबाजोगाई - लातुर रोडवर कशासाठी गेले होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मयत पवन कनले याचे वडील परभणी जिल्ह्यात महसूल विभागात कर्मचारी असल्याचे समजते.

टॅग्स :AccidentअपघातAmbajogaiअंबाजोगाईStudentविद्यार्थीroad safetyरस्ते सुरक्षा