शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षाची नवरी अन् १३ वर्षाचा नवरदेव; आईने लावला विवाह पण वधूच्या बापाने फोडली वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 12:08 IST

आष्टी तालुक्यातील एका गावातील घटना

- नितीन कांबळेकडा (बीड) : बालविवाह रोखले जावेत यासाठी सरकारने कडक कायदे केले असताना  कायद्याला झुगारून बालविवाह होताना दिसत आहेत. ११ वर्षाची नवरी अन् १३ वर्षाच्या नवरदेवाचा असाच एक बालविवाह हळदी समारंभात झाल्याचे आष्टी तालुक्यात समोर आले आहे. या प्रकरणी चार जणांवर २ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आष्टी शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात मागील १९ आक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आईने ११ वर्षाच्या मुलीचा विवाह करमाळा ( जि. सोलापूर) तालुक्यातील देवळाली येथील १३ वर्षीय मुलासोबत हळदी समारंभात लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार २१ आक्टोबर रोजी समोर आला आहे. खुद्द आईनेचे हा  विवाह लावून दिल्यानंतर बापाने या प्रकाराला वाचा फोडली. पोलिस अधीक्षक, आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन विवाह झाल्याची तक्रार दाखल केली.त्यानंतर ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके याच्या फिर्यादीवरून २ नोव्हेंबर रोजी सुशिला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

अल्पवयीन नवरी बालगृहातधक्कादायक प्रकार समजताच महिला बालहक्क समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, चाईल्ड लाईनच्या आश्विनी जगताप, बालहक्क कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी पुढाकार घेत अल्पवयीन नवरीला बीड येथील बालगृहात दाखल केले.

गावस्तरावरील बाल संरक्षण समित्या नावालाच!जिल्हाभरातील ग्रामबाल संरक्षण समिती नावालाच असून बालविवाह थांबवण्यास कसलाच पुढाकार घेतला जात  नाही.यापुढे जर गावस्तरावर बालविवाह झाला तर समितीला दोषी धरून योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी