शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 19:15 IST

ल नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला आहे

केज (बीड ): तालुक्यातील नांदुर घाट जिल्हा परिषद गटामध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास निधीच्या रकमेत भ्रष्टाचार करण्यात आल्याने याकडे ईडीने लक्ष घालावे, अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गावागावात लावलेल्या बॅनरची एकच चर्चा सध्या सुरु आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी विकास निधीच्या कामात भ्रष्टाचार झाला असून याच्या चौकशीची मागणी केली आहे.

 राज्यात ईडी मोठमोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत आहे. असेच गावागावातील लहान नेतेही मोठ्या भ्रष्टाचारात अडकले आहेत. केज तालुक्यातील नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला. मात्र, यातून झालेल्या कामांत अनियमता व भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केला आहे. गटातील १०० कोटींच्या भ्रष्टाचाराकडे ईडीने लक्ष घ्यावे आणि चौकशी करावी, अशी मागणी करणारे बॅनर मनसेने गावागावात लावले आहेत. या भ्रष्टाचाराची माहिती किरीट सोमय्या यांना देखील देणार असल्याचे बॅनरवर नमूद केले आहे. गावागावात लावण्यात आलेल्या बॅनरची दखल ईडी घेईल का नाही हे सध्या अनुत्तरित आहे. मात्र, या बॅनरबाजीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

असे आहेत आरोप नांदुर मध्ये सहाशे मीटर सिमेंट रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपये खर्च करूनही कामात दर्जा नाही सदर काम अपूर्ण आहे.या ठिकाणच्या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्याचा असा कोणता व्यवसाय आहे ज्यातून दोन कोटी रुपयांचे घर व कोट्यवधीची माया जमविण्यात आली आहे ? 

टॅग्स :BeedबीडMNSमनसेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCorruptionभ्रष्टाचार