बीड : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शंभर एकर जमीन बनावट दस्ताऐवज तयार करून हस्तांतरित करण्यात आली. याला महसूल विभाग कारणीभूत असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी नागरिकांनी आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
सर्व्हे नं. ७५, ७६, ७७, ८१, ८१/१ येथील शंभर एकर जमीन खोटे दस्तऐवज तयार करून हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जमीन देवस्थानाची आहे, याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, शेख युनूस, शेख अनिस, शेख दस्तगीर, शेख गुलाम, शेख रशीद मोहम्मद, शेख चांद, शेख हजरत, शेख नियाज यांच्यासह आदींची उपस्थिती असून या उपोषणामध्ये महिलांनीही हजेरी लावली आहे. याप्रकरणात लक्ष घालावे, असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व पालमंत्र्यांनाही दिल्याचे ढवळे यांनी सांगितले.