शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

मदतीचा बहाणा करून चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 19:50 IST

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई-: नदीत खेकडे धरूत अशी बतावणी करून ४ वर्षे वयाच्या बालिकेस निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश  व्ही. के. मांडे  यांनी गुरुवारी ठोठावली. अण्णा उर्फ भाऊराव प्रभाकर गदळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

या घटनेची माहिती अशी की, केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील फिर्यादी कुटुंब शेतात रहात होते. सदरील आरोपीने बालिकेच्या वडिलांकडे मदतनीस म्हणून काम करू लागला. तिथून बाहेर येऊन त्याने बलिकेस चल आपण नदीवर जाऊन खेकडे धरूत.असे म्हणत पीडित बलिकेस दूर अंतरावर घेऊन गेला.तिथे निर्जन स्थळी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळ झाली तरी आपली मुलगी कुठे आहे. याचा शोध तिचे कुटुंबीय घेऊ लागले. तिथे खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली असता. तुमची मुलगी तिकडे त्या व्यक्तीसोबत गेल्याचे सांगितले.शोध घेत कुटुंबीय तिकडे गेले असता पीडित बलिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुटुंबीयांनी मुलीला जवळ घेतले.व आरोपी तिथे पळसाच्या आळ्यात लपुन बसला होता.कुटुंबियांनी त्याला जागेवर पकडुन पोलीस ठाण्यात नेले.व त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४२ / २०१८, कलम ३७६ (२) (1), फौ. सु. का. - २०१८ व ३७६ ( 1 ) (2) भा. द. वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात  दोषारोप पत्र दाखल केले. हे प्रकरण अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश न्यायाधीश  व्ही. के. मांडे  यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस  १० वर्ष सश्रम कारावास ची शिक्षा व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.लक्ष्मण फड यांनी काम पाहीले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक  एस. एस. कदम यांनी केला होता. तर पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड