शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:24 IST

फिर्यादी भाऊच झाला होता फितूर 

बीड : मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी  मंगळवारी दोषी ठरवून  १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. शिरुर तालुक्यात २०१६ मध्ये हे प्रकरण घडले होते. पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली होती.

शिरुर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणी जन्मापासून मूकबधिर आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी  नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. पीडित तरुणीकडे कुटुंबीयांनी चौकशी केल्यानंतर तिने हातवारे करुन संपूर्ण  हकीकत सांगितली.  फेट्यावाल्याच्या मुलाने आपल्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे तिने खाणाखुणा करुन सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांना  आरोपीची खात्री पटली. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरुन १६ नोव्हेंबर २०१६ रोजी गावातीलच  हनुमंत विठोबा बांगर (२६) याच्याविरुध्द  गळा दाबून  जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. तो विवाहित असून त्यास एक मुलगा आहे. 

शिरुर ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक तानाजी दराडे यांनी या प्रकरणाचा तपास करुन  हनुमंत बांगरला बेड्या ठोकल्या. तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.  जिल्हा व सत्र न्या. बी.व्ही. वाघ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील  अनिल तिडके यांनी काम पाहिले. 

पीडितेची सोनोग्राफी करणारे डॉक्टर, ती मूकबधिर असल्याचा निर्वाळा देणारे डॉक्टर, तपास अधिकारी, तिचे नातेवाईक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी न्यायवैद्यक चाचणी अहवाल तसेच दुभाषकामार्फत पीडितेची साक्ष नोंदवून  केलेला युक्तिवाद  ग्राह्य धरुन न्या. वाघ यांनी आरोपी हनुंमत विठोबा बांगर यास कलम ३७६ अन्वये १० वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच बलात्कार करताना पीडितेचा गळा आवळून मारहाण केल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली. अ‍ॅड. अनिल तिडके यांना पैरवी अधिकारी फौजदार राजकुमार मोरे यांचे सहाय्य लाभले.

पीडितेचा भाऊच फितूरया प्रकरणात सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी १५ साक्षीदार तपासले.  पीडितेचा भाऊ फिर्यादी होता. तो फितूर झाला. मात्र, साक्षी, पुरावे तसेच पीडितेचा दुभाषकामार्फत नोंदविलेला जवाब यामुळे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविता आले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीBeedबीडCourtन्यायालय